सुहाना खान काय करत होती स्कीन क्लिनिकच्या बाहेर... लवकरच करणार सर्जरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 10:49 IST2017-12-22T05:19:21+5:302017-12-22T10:49:21+5:30
शाहरुख खानने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा बादशहा अशीच त्याची ओळख आहे. तो ...

सुहाना खान काय करत होती स्कीन क्लिनिकच्या बाहेर... लवकरच करणार सर्जरी?
श हरुख खानने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडचा बादशहा अशीच त्याची ओळख आहे. तो आज अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये राज्य करत आहे. त्याच्यानंतर आता त्याची पुढची पिढी चित्रपटसृष्टीत येण्यास सज्ज झाली आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. सुहाना सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिच्या सोशल नेटवर्किंग साइटवर चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.
सुहाना सध्या तिच्या वडिलांसोबत अनेक पार्टी, कार्यक्रमातही पाहायला मिळत आहे. या सगळ्यावरून ती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे म्हटले जाते. सुहानाला नुकतेच वांद्र्यातील एक स्कीन क्लिनिकच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधी ती काही सर्जरी करणार आहे की तिने मेकओव्हरसाठी त्या स्कीन क्लिनिकमध्ये हजेरी लावली होती अशा चर्चांना सध्या चांगलेच उधाण आले आहे.
मुंबईच्या धीरूबाई अंबानी स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुहानाने लंडनची निवड केली. सुहानाचा भाऊ आर्यन खान हा सुद्धा सध्या लंडनमध्येच शिकतो आहे. डान्सिंग आणि स्पोर्ट तिचे आवडीचे विषय आहेत. सुहानाने एक डान्सर म्हणून नाव कमवावे, असे शाहरूखला वाटतेय. अर्थात सुहानाने अभिनय क्षेत्रात यावे, यालाही शाहरूखची ना नाहीये. तसेही सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा जोरात सुरु झाल्या आहेत. अलीकडे शाहरूखची लाडकी लेक सुहाना एक उत्तम अभिनेत्री बनणार, मोठे नाव कमावणार, असे भाकीत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी वर्तवले होते. शाहरूख आणि गौरी खान यांनी २५ आॅक्टोबर १९९१ मध्ये लग्न केले होते. १९९७ मध्ये या दोघांचा मोठा मुलगा आर्यन याचा जन्म झाला होता. यानंतर २०००मध्ये सुहाना जन्मली होती. सन २०१३ मध्ये शाहरूख आणि गौरीचा तिसरा मुलगा अबरामचा जन्म झाला होता.
Also Read : सुहाना खानच्या ‘या’ टी शर्टची किंमत जाणून व्हाल थक्क !