WHAT ? ​कंगना राणौतमुळे हृतिक रोशनने नाकारला ‘सुपर30’??

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:03 IST2017-09-11T07:33:19+5:302017-09-11T13:03:19+5:30

हृतिक रोशनने विकास बहलचा ‘सुपर30’ हा चित्रपट साईन केल्याची बातमी अलीकडेच तुम्ही वाचली. केवळ इतकेच नाही तर हृतिक काही ...

WHAT? Hrithik Roshan denies 'super 30' because of Kangana Ranaut? | WHAT ? ​कंगना राणौतमुळे हृतिक रोशनने नाकारला ‘सुपर30’??

WHAT ? ​कंगना राणौतमुळे हृतिक रोशनने नाकारला ‘सुपर30’??

तिक रोशनने विकास बहलचा ‘सुपर30’ हा चित्रपट साईन केल्याची बातमी अलीकडेच तुम्ही वाचली. केवळ इतकेच नाही तर हृतिक काही दिवसांपूर्वी ‘सुपर30’ आनंद कुमार यांना भेटल्याचेही तुम्हाला ठाऊक आहेच. खुद्द आनंद कुमार यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.‘आताच मुंबई येथून पाटण्याला परतलो आहे; मात्र हृतिक रोशनसोबत जी भेट झाली ती विसरणे शक्य नाही. हृतिकने मला घरी बोलावून जो सन्मान दिला, त्यावरून तो एक चांगला कलाकार आहेच. शिवाय मोठ्या मनाचा मालकही आहे. धन्यवाद हृतिक’, असे आनंद कुमार यांनी हृतिकसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते. 

पण आता एक वेगळीच बातमी आहे. होय, कदाचित हृतिकला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडलेली नाही. त्यामुळेच की काय, हृतिकने हा सिनेमा सोडल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या मते, स्क्रिप्ट न आवडणे हा केवळ एक बहाणा आहे. हृतिकने हा चित्रपट नाकारण्यामागचे कारण काही वेगळेच आहे. होय, चर्चा खरी मानाल तर, विकास बहल या चित्रपटाशी जुळला असल्याने हृतिकने म्हणे हा चित्रपट नाकारला आहे. आता तुम्ही म्हणाल, हृतिक अन् विकास बहल यांच्यात असे काय झाले? तर काहीही नाही. खरा वाद आहे तो विकास बहलसोबत नव्हे तर विकास बहलच्या ‘क्वीन’सोबत. आम्ही कंगना राणौतबद्दल बोलतोय, हे तुम्हाला कळले असेलच. विकास बहल तोच दिग्दर्शक आहे, ज्याने कंगनाला रातोरात बॉलिवूडची ‘क्वीन’ बनवले. विकास बहलच्याच ‘क्वीन’नंतर कंगनाचे नशीब फळफळले होते. कंगनासोबतच्या वादानंतर हृतिकला म्हणे,कंगनाशी संबंधित कुठल्याही व्यक्तीसोबत काम करायचे नाहीय आणि हेच त्याच्या ‘सुपर30’ नाकारण्यामागचे कारण आहे. आता खरे काय ते हृतिक रोशनलाच माहित.

ALSO READ : ​कंगना राणौतच्या आरोपांवर का शांत आहे हृतिक रोशन ?

Web Title: WHAT? Hrithik Roshan denies 'super 30' because of Kangana Ranaut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.