काय झाले असेल जेव्हा जॅकलिन फर्नांडिसने चक्क जिवंत साप हातात पकडला असेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 21:17 IST2018-03-13T15:38:46+5:302018-03-13T21:17:55+5:30
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जॅकलिन व्हिडीओमध्ये चक्क एक जिवंत साप हातात पकडताना दिसत आहे.

काय झाले असेल जेव्हा जॅकलिन फर्नांडिसने चक्क जिवंत साप हातात पकडला असेल?
ब लिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी आपल्या आयुष्यात काही तरी नवे शिकणे पसंत करते. पोल डान्सिंगनंतर जॅकलिन घोडस्वारी करताना बघावयास मिळाली होती. तिचे याबाबतचे फोटोही समोर आले होते. आता इन्स्टाग्रामवर तिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती चक्क एक जिवंत साप आपल्या हातात पकडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा साप आपल्या हातात धरताना तिच्या चेहºयावर अजिबातच भीती दिसत नाही. ती अगदी सहजपणे साप हातात धरून उभी असल्याचे दिसते. त्याचबरोबर ती सापाबद्दल एकाला माहितीही विचारते. जॅकलिनने शेअर केलेला हा व्हिडीओ एकाच दिवसात तब्बल १३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे.
जॅकलिनने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘श्रीलंकेच्या एका वाइल्ड लाइफ रेस्क्यू सेंटरमध्ये’ व्हिडीओमध्ये जॅकलिनला कोणीतरी सांगत आहे की, साप त्याच्या जिभेनेच त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवतो. जेव्हा साप आपली जीभ बाहेर काढतो तेव्हाच त्याला आपल्या आजूबाजूच्या वस्तूंबद्दल जाणीव होते. हा व्हिडीओ बघितल्यानंतर जॅकलिनचे चाहते तिच्या धाडसाचे कौतुक करीत आहेत. एका यूजरने कॉमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘तू प्रत्येक गोष्टीत बेस्ट आहेस. तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तू खरोखरच एक साहसी महिला आहेस.’ बºयाचशा यूजर्सनी जॅकलिनच्या धाडसाचे कौतुक केले.
दरम्यान, जॅकलिन फर्नांडिस सध्या रेमो डिसूझाच्या ‘रेस-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात जॅकलिनसोबत अभिनेता सलमान खानही स्क्रिन शेअर करताना बघावयास मिळणार आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग अंतिम टप्प्यात असून, सर्व स्टारकास्ट अबूधाबीला आहे. हा चित्रपट ईदच्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान खान स्टारर ‘किक-२’मध्ये जॅकलिन पुन्हा झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र निर्मात्यांकडून अधिकृतरीत्या याबाबतची घोषणा करण्यात आली नाही. जॅकलिनने २००९ मध्ये ‘अलीदीन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.