10 कोटींच्या राजेशाही विवाह सोहळ्यात असं काय घडलं की समांथाला रडू कोसळलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 13:14 IST2017-10-09T07:44:02+5:302017-10-09T13:14:02+5:30

सध्या सर्वत्र एकाच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी इव्हेंट म्हणून पाहिला जाणारा हा लग्नसोहळा ठरला ...

What happened at the royal wedding ceremony of 10 crore that Samantha rushed down? | 10 कोटींच्या राजेशाही विवाह सोहळ्यात असं काय घडलं की समांथाला रडू कोसळलं ?

10 कोटींच्या राजेशाही विवाह सोहळ्यात असं काय घडलं की समांथाला रडू कोसळलं ?

्या सर्वत्र एकाच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील सगळ्यात मोठा सेलिब्रिटी इव्हेंट म्हणून पाहिला जाणारा हा लग्नसोहळा ठरला आहे. दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता नागार्जुनचा लेक नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांचा विवाहसोहळा सा-यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. राजेशाही सोहळ्यात चैतन्य आणि समांथा रेशीमगाठीत अडकले आहेत. तब्बल दहा कोटी रुपये खर्च आलेल्या या सोहळ्याची बातच न्यारी असं या सोहळ्याचे फोटो पाहून तुम्हाला वाटेल. मेंहदी, संगीत ते लग्न यापर्यंत सगळ्या गोष्टी राजेशाही होत्या. नववधू समांथाचा लूक, कपडे, दागिने सारंच काही राजेशाही लग्नाला साजेसं होतं. नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद या विवाह सोहळ्यातील प्रत्येक फोटोत पाहायला मिळाला. जन्मोजन्मीचं नातं जुळल्यानंतर चैतन्य आणि समांथाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या सोहळ्यातील प्रत्येक फोटोची काही ना काही खासियत आहे. असाच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो आहे नववधू समांथा रुथ प्रभूचा. चैतन्य आणि समांथा विवाह बंधनात अडकल्यानंतरचा हा फोटो आहे. या फोटोत समांथा रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकं राजेशाही थाटातील लग्नसोहळा,चैतन्यसारखा जोडीदार मिळूनही समांथा का रडत आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल.मात्र समांथाचे हे आनंदाश्रू आहेत.लग्नानंतर सासरी जाताना कोणत्याही मुलीला रडू कोसळतं. अगदी तशीच अवस्था समाथांचीही झाली होती. आपल्या माहेरच्या माणसांना सोडून सासरी जाताना नववधूची जशी अवस्था होती तीच समांथाचीही झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळेच की काय समाथांसुद्धा सासरी जाताना आपल्या अश्रूंना रोखू शकली नाही. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धार्मिक पद्धतीने चैतन्य आणि समांथा यांचा विवाहसोहळा पार पडला. रेशीमगाठीत अडकल्यानंतर नवदाम्पत्य 40 दिवसांच्या मोठ्या हनीमूनवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. याआधी नागा आणि समांथा दोन महिने हनीमूनसाठी जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.अभिनेता नागार्जुन यानं 'शिवा' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर मनीषा कोईरालासह त्याचा क्रिमिनल हा सिनेमाही नव्वदीच्या दशकात गाजला होता. मात्र नागार्जुनची खरी लोकप्रियता ही दक्षिणेच्या तेलुगू सिनेमात आहे. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचे दोन लेकही सिनेमात काम करत आहेत.

Also Read:नागार्जुनची ‘ती’ सून जी एकेकाळी बनली होती त्याची ‘ऑनस्क्रीन आई,जाणून घ्या कोणता आहे तो सिनेमा

Web Title: What happened at the royal wedding ceremony of 10 crore that Samantha rushed down?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.