काय सांगते सेलिब्रिटी कपल्सची देहबोली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:20 IST2016-02-12T08:20:17+5:302016-02-12T01:20:17+5:30
तुमच्या जीवलगावर तुम्ही किती प्रेम करता हे प्रत्येक वेळी शब्दांमधून सांगायलाच हवे असे काही नाही. एक प्रेमळ कटाक्ष, प्रेमाने ...
काय सांगते सेलिब्रिटी कपल्सची देहबोली?
तुमच्या जीवलगावर तुम्ही किती प्रेम करता हे प्रत्येक वेळी शब्दांमधून सांगायलाच हवे असे काही नाही. एक प्रेमळ कटाक्ष, प्रेमाने मारलेली मिठी किंवा नुसतीच एक प्रेमळ टपलीही तुमच्या मनातील भावना अभिव्यक्त करायला पुरेशी असते. प्रेमीयुगुलाची स्वत:ची अशी एक देहबोली असते. जी जगाला कळो न कळो त्यांच्या जवळच्या व्यक्तीला नक्कीच कळत असते. ही देहबोली सेलिब्रिटी कपल्सची असेल तर ती जगासाठी आयकॉनिक ठरते. त्याचीच ही काही उदाहरणे...
नीकेश अरोरा-आऐशा थापर
नीकेश आणि आऐशा हे दाम्पत्य जणू एकमेकांसाठीच बनलेले आहेत. म्हणूनच नीकेश जिथे-जिथे जातात त्यांना आऐशासोबत असाव्याशा वाटतात. त्यांच्या देहबोलीवरून ते आऐशा यांच्याबाबत काहीसे ‘प्रोटेक्टीव्ह’ वाटतात.
सैफ अली खान - करिना कपूर
दोघांमध्ये सैफ जास्त डॉमिनेटिंग वाटतो (किमान लोकांमध्ये तरी) तर करिना सैफच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसते. लोकांमध्ये असतानाही ते एकमेकांमध्येच गुंतलेले असतात. ही त्यांच्यासाठी सवयीची देहबोली झाली आहे.
रणवीर सिंग- दीपिका पदुकोण
एकीकडे रणवीर संपूर्ण जगाला आपले प्रेम दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो तर दीपिका मात्र याबाबतीत नेहमी कॉन्शिअस असते. मात्र तरीही तिला रणवीरचे लक्ष वेधून घ्यायला आवडते. दोघांमध्ये नाते आनंद आणि खेळकरपणाच्या झोपाळयावर झुलताना दिसते. जग आपल्याबद्दल काय विचार करते त्याकडे रणवीर लक्ष देत नाही. काहीशी बेफिकीर वृत्तीची व्यक्ती म्हणून रणवीरकडे पाहिले जाते. दीपिकालाही त्याची ही बेफिकरी आवडते.
मिला कुनीस- अॅस्टोन कुचिर
दोघांची देहबोली ते खूपच बिनधास्त कपल असल्याचे सांगते. दोघांमधली मैत्री हेच त्यांच्यातील केमिस्ट्री असल्याचे सातत्याने लक्षात येते. तिचे त्याच्या खांद्यावर हात ठेवून बिनधास्त उभे राहणे, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणे दोघांना एकमेकांची साथ खूपच आवडत असल्याचे सांगते.