​ब्रेकअपनंतर काय करतेयं अंकिता??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 18:17 IST2016-06-07T12:47:10+5:302016-06-07T18:17:10+5:30

सुशांतसिंह राजपूत व अंकिता लोखंडे यांचे ब्रेकअप झाल्याचे आता जगजाहिर झालेय. ब्रेकअपनंतर सुशांत चित्रपटांमध्ये बिझी आहे. इतका की, भूतकाळात ...

What do you do after breakup? | ​ब्रेकअपनंतर काय करतेयं अंकिता??

​ब्रेकअपनंतर काय करतेयं अंकिता??

शांतसिंह राजपूत व अंकिता लोखंडे यांचे ब्रेकअप झाल्याचे आता जगजाहिर झालेय. ब्रेकअपनंतर सुशांत चित्रपटांमध्ये बिझी आहे. इतका की, भूतकाळात डोकावून पाहायला त्याला अजिबात वेळ नाही. अंकिता मात्र सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर कमालीची एकाकी पडलीय. पण हळूहळू यातून बाहेर पडण्याचे तिचे प्रयत्न आहेत. अलीकडे अंकिताने ‘सरबजीत’च्या प्रीमीयर बोल्ड अवतारात हजेरी लाचून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता या प्रिमीअरच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकटी दिसली होती. पण कदाचित अंकिताचा हा एकटेपणा तिच्या पालकांना कळला असावा. त्याचमुळे अंकिताला भेटण्यासाठी अंकिताचे मम्मी-पप्पा मुंबईला आलेत. मम्मी-पप्पांसोबत अंकिताने मस्तपैकी वेळ घालवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपनंतर अंकिता एकटी पडू नये, म्हणून तिच्या मित्रांनी तिला खूप सहकार्य केले. तिचे मित्र-मैत्रिणी रोज तिच्या मलाडच्या घरी यायचे. या मित्रांनी अंकिताना अजिबात एकटेपणा जाणवू दिला नाही. आता मम्मी-पप्पा अंकिताच्या मदतीला धावून आले आहेत. इतके सगळे प्रेम करणारे असताना अंकिताला एकाकी वाटण्याचे कारण नाही, ते म्हणूनच...
 

Web Title: What do you do after breakup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.