​सलमानकडून ‘ब्रांड’ हिसकावण्यासाठी रणवीरने केले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 11:40 IST2016-11-10T11:40:37+5:302016-11-10T11:40:37+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याचा ‘तुफानी’ प्रवास संपला, हे तुम्हाला ठाऊक आहेच. होय, ‘आज कुछ तुफानी करते ...

What did Ranveer do to get rid of 'Brand' from Salman? | ​सलमानकडून ‘ब्रांड’ हिसकावण्यासाठी रणवीरने केले काय?

​सलमानकडून ‘ब्रांड’ हिसकावण्यासाठी रणवीरने केले काय?

लिवूडचा ‘दबंग खान’ अर्थात सलमान खान याचा ‘तुफानी’ प्रवास संपला, हे तुम्हाला ठाऊक आहेच. होय, ‘आज कुछ तुफानी करते है...’ म्हणत एका मोठ्या कोल्ड ड्रिंकची बाटली गटागट पोटात रिचवणारा सलमान आता जाहिरातींमध्ये आपल्याला   दिसणार नाही. या कोल्ड ड्रिंक ब्रांडने सलमानला टाटा -बाय-बाय करत ‘बॉलिवूडचा बाजीराव’ रणवीर सिंह याला जवळ केले आहे. आता एक नवी खबर आहे. सलमानच्या हातून हा ब्रांड हिसकावून घेण्यासाठी रणवीरने म्हणे आपली ‘ब्रांड व्हॅल्यू’ कधीनव्हे इतकी कमी केली. सन २०००मध्ये २०१२ पर्यंत अक्षय कुमार या ब्रांडच्या जाहिराती करताना दिसला. यानंतर २०१२मध्ये सलमान या जाहिरातींमध्ये दिसू लागला. गत चार वर्षांत सलमान या ब्रांडची ओळख बनला होता. पण अचानक या ब्रांडने सलमानला रिप्लेस करत रणवीरशी करार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ब्रांड मिळावा म्हणून आपले भाव बरेच कमी केले. रणवीर एका डीलसाठी ४ ते ५ कोटी रुपए घेतो. याअर्थाने त्याची ‘ब्रांड व्हॅल्यू’  सुमारे ५० कोटी रुपए आहे. मात्र या ब्रांडच्या जाहिराती मिळवण्यासाठी रणवीरने सलमानपेक्षा एक तृतीयांश कमी रक्कम घेतली. सलमान या ब्रांडसाठी सुमारे १८ कोटी रुपए घेत होता.
कोल्ड ड्रिंकचा हा ब्रांड सलमानकडून हिसकावून घेतल्यानंतर रणवीरची लोकप्रीयता वेगाने वाढते आहे. जाणकारांच्या मते, चित्रपटांत येण्यापूर्वी रणवीरने एकेकाळी कॉपी राईटर म्हणून काम केले होते. त्याचा फायदा त्याला क्रिएटिव्यमध्ये मिळतो. त्याचमुळे तो टीव्ही कमर्शिअल्ससाठी पसंतीचा चेहरा ठरतो आहे. रणवीर सध्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. लवकरच त्याचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: What did Ranveer do to get rid of 'Brand' from Salman?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.