फोटो डिलीट करण्यासाठी गौरीने काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 20:56 IST2016-11-12T20:56:38+5:302016-11-12T20:56:38+5:30
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने एका फोटोग्राफ रला (पॅपराझी) फोटो डिलीट करण्यासाठी पैसे आॅफर केल्याची सध्या ...

फोटो डिलीट करण्यासाठी गौरीने काय केले?
गौरी खान ही मुंबईत आपल्या नव्या शोरूमसाठी जागेचा शोध घेत आहे. मुंबईतील एका ठिकाणी जागेची पाहणी करण्यासाठी ती गेली असताना एका फोटोग्रॉफरने तिचा फोटो काढला. आपला फोटो कुणीतरी क्लिक केल्याचे लक्षात येताच ती जाम चिडली. तिने आपल्या बॉडीगार्डला पाठवून फोटोग्राफरला फोटो डिलीट करण्यास सांगितले. मात्र फोटोग्राफरने यास नकार दिल्याने तिने दुसरा मार्ग अवलंबण्याचा विचार केला असावा. यामुळे गौरी स्वत: फोटोग्रॉफरजवळ जाऊन त्याला फोटो डिलीट करण्याची विनंती केली. मात्र फोटोग्राफरने तिच्या या विनंतीला देखील नकार दिला. यामुळे गौरीने त्याला 5000 (पाच हजार) रुपये देत असल्याचे सांगितले. मात्र त्याने त्यासही नकार दिला.
फोटोग्राफरच्या मते गौरीच्या त्या फोटोत असे काहीच नव्हते की तो डिलीट करावा लागेल. तो एक साधा फोटो होता. यामुळे त्याने त्यास नकार दिला. सेलिब्रेटींचे फोटो काढण्यासाठी मुंबईमध्ये अनेक फोटोग्राफर मागावर असतात. हे त्यांच्या रोजीरोटीचे साधन आहे. आपल्या कामाला त्या फोटोग्राफरने प्राधान्य दिले असे मानले जात आहे.
46 वर्षीय गौरी खान केवळ शाहरुख खानची पत्नी आहे असे नाही तर ती चित्रपट निर्माती व इंटिरीअर डिझायनर आहे. शाहरुख व गौरी यांचे लव्ह मॅरेज असून दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत.