‘डीअर जिंदगी’साठी आलियाने काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 21:38 IST2016-11-09T21:38:42+5:302016-11-09T21:38:42+5:30
आलियाने काय केले हे दाखविण्याचा प्रयत्न एका व्हिडीओतून करण्यात आला आहे.

‘डीअर जिंदगी’साठी आलियाने काय केले?
या चित्रपटाच्या ट्रेलरमधून शाहरुख व आलिया यांच्यातील खास नाते दाखविण्यात आले होते. यात आलिया कायरा नावाच्या युवतीची भूमिका करीत असून ती कुणाल कपूरच्या प्रेमात आहे. हा चित्रपट आलियासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. डीअर जिंदगीच्या सेटवर आलिया कशी वावरत होती हे या व्हिडीओतून दाखविण्यात आले आहे. ‘आलिया भट्ट अॅज डायरेक्टर आॅफ फोटोग्रॉफी’ असे या व्हिडीओला नाव देण्यात आले आहे.
यात ती एका गाण्याच्या शूटिंगची जबाबदारी सांभळताना दिसतेय. विशेष म्हणजे ती कॅमेरा चालविताना दिसतेय. या व्हिडीओमध्या दिग्दर्शिका गौरी शिंदे हिने आपले मत नोंदविले आहे. यासोबतच आलिया आपल्या शूटिंगचे अनुभव सांगते आहे. फॅशन स्टायलिश अनिता श्रॉफ अडजानिया हिने आलियाच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल माहिती दिलीय. अभिनेता राज भंसल व गौतमिक यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया नोंविल्या आहेत. शाहरुख व आलिया यासिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात आलिया व शाहरुख यांच्या भूमिका काय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
चाल तर पाहुया कसा आहे हा व्हिडीओ...