- तर मी आत्महत्या करेन... ! चाहत्याची शाहरूख खानला धमकी; कारण वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 10:59 IST2019-12-31T10:59:35+5:302019-12-31T10:59:58+5:30
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चाहत्यांमध्ये आजही तो बादशहा आहे.

- तर मी आत्महत्या करेन... ! चाहत्याची शाहरूख खानला धमकी; कारण वाचून बसेल धक्का
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चाहत्यांमध्ये आजही तो बादशहा आहे. आता तर शाहरूखचे चाहते त्याचा चित्रपट पाहण्यासाठी नको इतके आतूर झाले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित ‘झिरो’ या सिनेमानंतर शाहरूखने कुठल्याही नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. साहजिकच शाहरूखला पडद्यावर पाहण्यासाठी आतूर झालेल्या चाहत्यांचा संयम आताश: सुटू पाहतोय. होय, एका अशाच चाहत्याने चक्क आत्महत्येची धमकी दिली आहे. येत्या 1 जानेवारीला तू चित्रपटाची घोषणा केली नाही तर मी आत्महत्या करेन, अशी थेट धमकी या चाहत्याने शाहरूखला दिली आहे.
अन्य एका चाहत्यानेहीही ‘मी सुद्धा वाट पाहतोय. आणखी किती प्रतीक्षा करू सर. तुम्ही नव्या चित्रपटाची घोषणा केली नाही तर मी ट्विटर सोडेन,’ असा इशारा दिला आहे. यासोबतच ट्विटरवर #WeWantAnnouncementSRK हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
Announcement @iamsrk 😭😭#WeWantAnnouncementSRKpic.twitter.com/aOrCzv7ak2
— Sabse bade star ka Fan🇮🇳 (@iamvijay79) December 28, 2019
डिसेंबर २०१८ मध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाकडून शाहरूखला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. त्यानंतर किंग खानने चित्रपटांपासून ब्रेक घेतला.
I never used to think About Announcement
— Pariwarthan SRKian Patel🇳🇵 (@imSRKsDevotee) December 28, 2019
I had faith In @iamsrk Sir, Still Have(The Day I Loose Faith in SRK is the day I'm Dead)
But, Ab Mujhe v lagta hai, bahut hi jyada der ho gayi ab 😔🥺#WeWantAnnouncementSRK
Sir, The World is Waiting 😭 pic.twitter.com/n3QJ1GpMCO
Pllzzz....😭😭😭😭
— Arzoo 💞 (@SHAH_ki_Arzoo_) December 28, 2019
Announcement kar do #ShahRukhKhan
❤❤😘😭😭@iamsrk 😘😘😘#WeWantAnnouncementSRKpic.twitter.com/E0Eb8kH4su
गेल्या वर्षभरात त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. शिवाय त्याने एकाही चित्रपटाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणा-या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला आवाहन केले आहे. अशात या चाहत्यांना शाहरूख काय उत्तर देतो, कसे शांत करतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.