'बिग बॉस'मध्ये शाहरुखचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:25 IST2016-01-16T01:20:21+5:302016-02-08T05:25:25+5:30

           'बिग बॉस' या रियालिटी शोचा नवा हंगाम सुरू झाला असून शाहरुखची इच्छा असल्यास तो याद्वारे ...

Welcome to Shahrukh in 'Bigg Boss' | 'बिग बॉस'मध्ये शाहरुखचे स्वागत

'बिग बॉस'मध्ये शाहरुखचे स्वागत


/>           'बिग बॉस' या रियालिटी शोचा नवा हंगाम सुरू झाला असून शाहरुखची इच्छा असल्यास तो याद्वारे 'दिलवाले' या आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करू शकतो, असे सलमान खानने म्हटले आहे. ''एसआरके घरात राहण्यास येईल, असे मला वाटत नाही. तो शोमध्ये आल्यास मला नक्कीच आवडेल. शाहरुखच्या तारखा उपलब्ध असतील तर,मला त्याचे स्वागत करायला नक्कीच आवडेल.

             त्याने येथे यावे, आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करावे, मजा करावी.. त्याच्याकडे खूप अनुभव आहे., तो इतरांसोबत शेअर करावा,'' असे सलमानने 'बिग बॉस'च्या पत्रकार परिषदेत शाहरुखच्या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

             शाहरुखचा 'दिलवाले' येत्या १८ डिसेंबरला रिलीज होत आहे. त्या वेळी 'बिग बॉस' जोरात असेल. अलीकडे सर्वच स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रियालिटी शोमध्ये हजेरी लावतात. हा ट्रेण्ड बघता, यावेळी शाहरुख 'बिग बॉस'मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक वर्षांच्या कोल्डवॉरनंतर या दोघांचे संबंध सामान्य झाले आहेत.

Web Title: Welcome to Shahrukh in 'Bigg Boss'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.