आ दित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली त्याच्या 'हिरो' या चित्रपटामुळे चर्चेत आला. परंतू तरीही खरी चर्चा सूरू झाली जेव्हा ...
आम्ही फक्त मित्रच - आ दित्य पांचोली
/>आ दित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली त्याच्या 'हिरो' या चित्रपटामुळे चर्चेत आला. परंतू तरीही खरी चर्चा सूरू झाली जेव्हा त्याचे नाव सूनिल शेट्टीच्या कन्येसोबत म्हणजेच अथिया सोबत जोडले गेले तेव्हा. एका मुलाखतीदरम्यान या विषयावर विचारले असता सुरज म्हणाला, 'आम्ही एकमेकांना कधीच डेट करत नाही. तसेच आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल तशा फिलींग नसल्यामुळे भविष्यातही आम्ही कधी डेट करू असे मुळीच वाटत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही नेहमी मिळणार्या कामाबद्दलच चर्चा करत असतो.' बॉलिवूडमध्ये सुरजला स्पष्टवक्ता म्हणून ओळखले जाते. त्याच्या आधीच्या अफेअर्सबाबत आणि करिअरबाबत त्याने याआधीही मोकळी चर्चा केली आहे. त्यामुळे सूरजच्या याही बोलण्यात तथ्य आहे, असे वाटते.
Web Title: We are just friends - come true Pancholi