Watch Video : सलमान खानने आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस बनवला खास, गायले ‘हे’ खास गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:20 IST2017-11-21T09:50:28+5:302017-11-21T15:20:28+5:30

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या घरी गत शनिवारी ग्रँड पार्टी रंगली होती. बहिण अर्पिताच्या लग्नाच्या वाढदिवसासोबतच सलमानचे आई-वडील सलीम आणि सलमा यांच्या लग्नाच्या ५३वा वाढदिवस असे या पार्टीचे दुहेरी औचित्य होते.

Watch Video: Salman Khan made his parents' wedding anniversary special, sung 'This' special song! | Watch Video : सलमान खानने आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस बनवला खास, गायले ‘हे’ खास गाणे!

Watch Video : सलमान खानने आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस बनवला खास, गायले ‘हे’ खास गाणे!

लिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याच्या घरी गत शनिवारी ग्रँड पार्टी रंगली होती.  बहिण अर्पिताच्या लग्नाच्या वाढदिवसासोबतच  सलमानचे आई-वडील  सलीम आणि सलमा यांच्या लग्नाच्या ५३वा वाढदिवस असे या पार्टीचे दुहेरी औचित्य होते. खान कुटुंबासोबत बॉलिवूडचे सलमानच्या अगदी जवळचे काही सेलिब्रिटी या पार्टीत हजर होते. याच पार्टीतला एक इनसाईड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूम करतोय. हा व्हिडिओ कसला तर, या पार्टीत सलमानने आई-वडिलांना दिलेल्या एका खास सरप्राईजचा. आता हे सरप्राईज कुठले? हे तर तुम्हाला कळायलाच हवे. हे सरप्राईज म्हणजे सलमानने स्वत: गायलेले गाणे. होय, खास आई-वडिलांसाठी सलमानने  ‘जब कोई बात बिगड जाए’ हे गाणं गायलं आणि हे गाणं सगळ्यांनाच भावलं. सलमानच्या आवाजातील अनेक गाणी आपण चित्रपटांत ऐकली असतील. पण आई-वडिलांसाठी गायलेले त्याचे हे गाणे त्या सर्व गाण्यांवर मात करणारे आहे. तुम्हीही ते ऐका आणि सलमानचा हा अंदाज कसा वाटला ते आम्हाला सांगा. 




ALSO READ : सलमान खान आणि कॅटरिना कैफ करताहेत ‘‘स्वॅग से स्वागत...’!!

  सलमान आणि कॅटरिना कैफ इंडियन सुपर लीगमध्ये परफॉर्म करण्यासाठी कोच्चीला गेले होते. तेथून हे दोघे थेट पार्टीला पोहोचले. यावेळी सलमानची कथित प्रेयसी यूलिया वंतूर त्याच्यासोबतच होती.  मलायका अरोरा, अमृता अरोरा, सोहा अली खान, कुणाल खेमू, दिया मिर्झा असे बरेच कलाकार या पार्टीत हजर होते.
सलमान सध्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो कॅटरिनासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय अलीकडे ‘रेस3’चे शूटींगही सलमानने सुरु केले आहे. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट जॅकलिन फर्नांडिस हिची वर्णी लागली आहे.

Web Title: Watch Video: Salman Khan made his parents' wedding anniversary special, sung 'This' special song!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.