watch VIDEO : ​कंगना राणौतने गंगेत डुबकी मारत केले पवित्र स्नान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 11:46 IST2017-05-05T06:11:22+5:302017-05-05T11:46:56+5:30

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत हिने वाराणसीच्या पवित्र घाटावर आपल्या ‘मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. यानंतर कंगनाने जगप्रसिद्ध गंगा आरतीत भाग घेतला. सोबत गंगेत पाच वेळा डुबकी मारत पवित्र स्नान केले

Watch VIDEO: Kangana Ranaut dipped the sacred bath! | watch VIDEO : ​कंगना राणौतने गंगेत डुबकी मारत केले पवित्र स्नान!

watch VIDEO : ​कंगना राणौतने गंगेत डुबकी मारत केले पवित्र स्नान!

लिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत हिने वाराणसीच्या पवित्र घाटावर आपल्या ‘मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर चित्रपटाच्या २० फुट लांब पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यानंतर कंगनाने जगप्रसिद्ध गंगा आरतीत भाग घेतला. सोबत गंगेत पाच वेळा डुबकी मारत पवित्र स्नान केले. काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिने गंगाआरतीत भाग घेतला होता. आईच्या इच्छेखातर तिने गंगाआरती केली होती. आता दीपिका पाठोपाठ कंगनाही मोठ्या भक्तिभावाने गंगाआरती करताना दिसली.
झांसीची राणी लक्ष्मीबार्इंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबार्इंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. त्याचमुळे ‘मणिकर्णिका: दी क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चसाठी वाराणसीची निवड करण्यात आली.





काही दिवसांपूर्वी कंगनाच्या या चित्रपटातील लूकचे फर्स्ट स्केच जारी झाले होते. कंगनाचा हा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. पुढील वर्षी २७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलीकडे कंगनाचा ‘रंगून’ हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळे या नव्या चित्रपटाकडून कंगनाला बºयाच अपेक्षा आहेत.





कृष दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिलीय के व्ही विजयेंद्र यांनी. के व्ही विजयेंद्र यांनी अलीकडे प्रदर्शित ‘बाहुबली2’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमांची पटकथा लिहिली होती. यातील संवाद व गीत प्रसून जोशी यांचे आहेत. शंकर महादेवन यांनी चित्रपटाची गाणी गायली आहेत.

Web Title: Watch VIDEO: Kangana Ranaut dipped the sacred bath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.