watch Video : जॅकलिन फर्नांडिस झाली ‘जस्टीन’मय; भडकला वरूण धवन!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 15:33 IST2017-05-04T10:02:11+5:302017-05-04T15:33:21+5:30
‘जुडवा2’च्या शूटींगवर लक्ष द्यायचे सोडून जॅकलिन जस्टीन बीबरच्या भारत दौºयावर जास्त लक्ष देतेय. ‘जुडवा2’पेक्षा जस्टीनच्या इंडिया टूरबद्दल ती अधिक उत्सूक आहे. जॅकलिनचा हिरो वरूण धवन यामुळे कमालीचा भडकला आहे. विश्वास बसत नाही, तर सोबत दिलेला व्हिडिओ बघा...

watch Video : जॅकलिन फर्नांडिस झाली ‘जस्टीन’मय; भडकला वरूण धवन!!
श रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस व वरूण धवन ‘जुडवा2’मध्ये बिझी आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. आता अशात जॅकलिनने आपले सगळे लक्ष्य या चित्रपटावर केंद्रीत करायला हवे ना? पण हे काय, ‘जुडवा2’च्या शूटींगवर लक्ष द्यायचे सोडून जॅकलिन जस्टीन बीबरच्या भारत दौºयावर जास्त लक्ष देतेय. ‘जुडवा2’पेक्षा जस्टीनच्या इंडिया टूरबद्दल ती अधिक उत्सूक आहे. जॅकलिनचा हिरो वरूण धवन यामुळे कमालीचा भडकला आहे. विश्वास बसत नाही, तर सोबत दिलेला व्हिडिओ बघा...
‘जुडवा2’च्या सेटवर जॅकलिन अक्षरश: जस्टीनमय झाली होती. मग काय, वरूणचा राग अनावर झाला अन् त्याने जॅकला चांगलेच सुनावले. वरूणने आपल्या सोशल अकाऊंटवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला खरे काय ते कळेलच. पण त्यापूर्वी तुम्ही फार सिरिअसली घेऊ नका हं. कारण हा व्हिडिओ म्हणजे, नुसती धम्माल मस्ती आहे. उद्या जॅकलिन व वरूण ‘उंची है बिल्डिंग....’ या गाण्याचे शूटींग करणार आहेत. हीच एक्साईटमेंट वरूणने या व्हिडिओद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे. जस्टीनला सोड आणि या गाण्यावर लक्ष दे, असे वरूण जॅकला यात म्हणतोय. पण जॅकलिन जस्टीनच्या प्रेमात इतकी वेडी झालीयं की, ती ‘उंची है बिल्डिंग....’हे गाणेही जस्टीनच्या ‘बेबी बेबी’ स्टाईलमध्ये गात सुटलीय. आता या व्हिडिओची खरी गंमत आम्ही सांगण्याऐवजी तुम्हीच पाहायला हवी... तेव्हा पाहा तर...
जस्टीन येत्या १० मे रोजी भारत दौºयावर येतोय. यावेळी जॅक जस्टीनला मुंबई दर्शन घडवणार आहे. गेट वे आॅफ इंडिया, इस्कॉन मंदिर, कुलाबा कॉज वेसह वांद्रे फिल्मसिटीचे दर्शन घडवण्यासोबतच जस्टीनला ती धारावी झोपडपट्टीतील मुलांना भेटवणार आहे. जस्टीनसाठी खास महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन आणि गुजराती मेन्यूसह शाही मेजवाणीही ती देणार आहे. एकंदर काय तर जस्टीनच्या स्वागतासाठी जॅक अगदी सज्ज झाली आहे.
ALSO READ : जस्टीन बीबरला मुंबईची सैर घडवणार जॅकलिन फर्नांडिस!