Watch Video : ‘बाहुबली’मध्ये दिग्दर्शक राजामौली यांची भूमिका तुम्ही बघितली काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 14:08 IST2017-05-13T08:38:39+5:302017-05-13T14:08:39+5:30

‘बाहुबली’मध्ये दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही भूमिका साकारली आहे. कदाचित ही बाब प्रेक्षकांनी नोटीस केली नसली तरी, आम्ही राजामौली यांच्या भूमिकेचा हा व्हिडिओ खास ‘सीएनएक्स मस्ती’च्या वाचकांसाठी देत आहोत.

Watch Video: Have you seen the role of Rajamouli in 'Bahubali'? | Watch Video : ‘बाहुबली’मध्ये दिग्दर्शक राजामौली यांची भूमिका तुम्ही बघितली काय?

Watch Video : ‘बाहुबली’मध्ये दिग्दर्शक राजामौली यांची भूमिका तुम्ही बघितली काय?

दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’चा फिव्हर अजूनही कमी झालेला दिसत नाही. कारण दर दिवसाला हा चित्रपट कमाईचा एक नवा उच्चांक गाठत असल्याने बॉलिवूडकरांमध्ये अक्षरश: धडकी भरली आहे. एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सगळेच पात्र दमदार असल्याने या चित्रपटांने इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे ‘बाहुबली’मध्ये दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीही भूमिका साकारली आहे. कदाचित ही बाब प्रेक्षकांनी नोटीस केली नसली तरी, आम्ही राजामौली यांच्या भूमिकेचा हा व्हिडिओ खास ‘सीएनएक्स मस्ती’च्या वाचकांसाठी देत आहोत. 



‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी तुडूंब गर्दी केली. त्याचीच प्रचिती म्हणून चित्रपटाने आतापर्यंत तब्बल १२५६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. असो, दिग्दर्शक राजामौली यांच्याविषयीच बोलायचे झाल्यास, त्यांनीही या चित्रपटात एक भूमिका साकारली आहे. होय, आम्ही ‘बाहुबली’च्या पहिल्या भागाविषयी बोलत आहोत. यामध्ये एका गाण्याच्या सुरुवातीला राजामौली मद्यविक्री करताना बघावयास मिळतात. राजामौली यांची ही भूमिका कदाचित प्रेक्षकांनी फारशी नोटीस केली नसावी, मात्र आता ही बाब समोर आली आहे. 



काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राजामौली ‘बाहुबली-२’च्या स्क्रीनिंगसाठी लंडनला उपस्थित होते. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब व चित्रपटाचे निर्मातेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या ‘बाहुबली’च्या पहिल्या भागातील भूमिकेविषयी चर्चा रंगली होती. ‘बाहुबली-२’विषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटाच्या हिंदी वर्जनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, राम्या कृष्णन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Web Title: Watch Video: Have you seen the role of Rajamouli in 'Bahubali'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.