Watch Trailer : ...अखेर रिलीज झाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा दमदार ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 22:12 IST2017-06-27T15:07:29+5:302017-06-27T22:12:03+5:30

​बºयाच दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेला अलंकृत श्रीवास्तव यांचा बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला आता भारतात रिलीज करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे.

Watch Trailer: ... finally released 'Lipstick Under My Burkha's Strong Trailer !!' | Watch Trailer : ...अखेर रिलीज झाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा दमदार ट्रेलर!!

Watch Trailer : ...अखेर रिलीज झाला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चा दमदार ट्रेलर!!

याच दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेला अलंकृत श्रीवास्तव यांचा बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला आता भारतात रिलीज करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने निर्माते आणि सेन्सॉरमध्ये वाद निर्माण झाला होता. एकता कपूर हिच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा अशा चार महिलांची आहे, ज्या स्वातंत्र्य आयुष्य जगू इच्छितात. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये दाखविण्यात येत असलेली चार महिलांची कथा खूपच दमदार असल्याचे बघावयास मिळते. 

एक बुरखा घालणारी कॉलेज विद्यार्थिनी, एक तरुण ब्युटिशियन, एक तीन मुलांची आई आणि एक ५५ वर्षाची विधवा अशा या चार महिला असून, त्यांना स्वत:च्या अटी-शर्तींवर आयुष्य जगायचे असते. परंतु समाज त्यांना हा अधिकार देत नाही. रतना पाठक-शाह, कोंकणा सेन शर्मा आणि अहाना कुमरा यांनी अतिशय दमदार भूमिका केल्यास असून, बोल्ड सीन्स देण्यातही त्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 



दरम्यान, आज आॅनलाइन रिलीज करण्यात आलेला चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. ट्रेलर बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाशी का भांडावे लागले असेल? कारण चित्रपटाचा विषय हा खूपच संवेदनशील आहे. त्यातच चित्रपटात दाखविण्यात आलेले सेक्स सीन्स आणि शिवीगाळ चित्रपटासाठी खूपच त्रासदायक ठरणारी आहे. असे असतानाही निर्मात्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, भारतात चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे.  

काही दिवसांपूर्वीच न्यू यॉर्क येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय फिल्म महोत्सवात कोंकणा सेन शर्मा हिला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. हा चित्रपट २१ जुलै रोजी भारतात रिलीज केला जाणार आहे. आता प्रेक्षकांना चित्रपट कितपत पचनी पडेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. परंतु सेन्सॉरने त्यांचा निर्णय मागे घेतल्याने निर्मात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

Web Title: Watch Trailer: ... finally released 'Lipstick Under My Burkha's Strong Trailer !!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.