WATCH : ​मीडियाच्या शेकडो कॅमे-यांसमोर एकाच कपातून कॉफी पितांना दिसले सलमान खान अन् कॅटरिना कैफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 14:19 IST2018-03-26T08:49:04+5:302018-03-26T14:19:04+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांच्या ‘अफेअर’च्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. होय, अलीकडे पुण्यातील एका इव्हेंटमध्ये जे काही घडले, त्यानंतर कॅट व सल्लूमियाँमध्ये काही तरी खिचडी नक्की पकतेय, असे मानले जात आहे.

WATCH: Salman Khan and Katrina Kaif have seen coffee from a single cup in front of hundreds of media cameras. | WATCH : ​मीडियाच्या शेकडो कॅमे-यांसमोर एकाच कपातून कॉफी पितांना दिसले सलमान खान अन् कॅटरिना कैफ!

WATCH : ​मीडियाच्या शेकडो कॅमे-यांसमोर एकाच कपातून कॉफी पितांना दिसले सलमान खान अन् कॅटरिना कैफ!

लिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांच्या ‘अफेअर’च्या चर्चांना पुन्हा एकदा जोर चढला आहे. होय, अलीकडे पुण्यातील एका इव्हेंटमध्ये जे काही घडले, त्यानंतर कॅट व सल्लूमियाँमध्ये काही तरी खिचडी नक्की पकतेय, असे मानले जात आहे. या इव्हेंटमधील दोघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे, सलमान, कॅटरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘द दबंग टूर’च्या इव्हेंटमधला.‘द दबंग टूर’च्या निमित्ताने सलमान, कॅट आणि सोनाक्षी असे तिघेही पुण्यात होते. मुख्य कार्यक्रमाआधी तिघांनीही एका पत्रपरिषदेला संबोधित केले. पण या पत्रपरिषदेत जे काही घडले, ते पाहून सगळेचं अवाक झालेत.



होय, शेकडो कॅमे-यांसमोर सलमान व कॅटरिना हे दोघेही या पत्रपरिषदेत एकाच कपाने कॉफी पितांना दिसले. कॉफीचा मग आधी सलमानच्या हातात असतो. तो आधी कॉफी पितो. नंतर आपला कप तो कॅटरिनाला देतो. कॅट हळूच हसत सलमानच्या हातातून कप घेते आणि कॉफीचा एक सिप घेऊन कप टेबलावर ठेवते. सलमान पुन्हा हा कप उचलतो आणि कॉफी प्यायला लागतो. सलमानला असे करताना पाहून कॅट काहीशी लाजते अन् हळूच हसते, असे या व्हिडिओत दिसतेय. सलमान व कॅटचे प्रत्यक्षात काय नाते आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण या व्हिडिओमधील त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसतेय. केवळ इतके नाही तर दोघेही एकमेकांच्या किती जवळ आहेत, हेही यावरून दिसतेय. नुकताच कॅट व सलमानचा ‘टायगर जिंदा है’ रिलीज झाला होता. या चित्रपटात कॅट व सलमानची अशीच केमिस्ट्री दिसली होती.

ALSO READ : सलमान खान म्हणतो, आता कधीच करणार नाही ‘ती’ चूक!!

खरे तर सलमान व कॅटरिना हा आॅनस्क्रीन रोमान्स लवकरात लवकर रिअल लाईफ रोमान्समध्ये बदलावा, अशीचं चाहत्यांची इच्छा आहे. आता तर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत. ताज्या व्हिडिओतील सलमान व कॅटरिनाचे एकमेकांसोबतचे वागणे पाहून तरी हेच वाटतेय.

Web Title: WATCH: Salman Khan and Katrina Kaif have seen coffee from a single cup in front of hundreds of media cameras.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.