watch : ‘मेरी प्यारी बिंदू’चा मन मोहून टाकणारा रोमॅन्टिक टीजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 14:47 IST2017-03-31T09:17:30+5:302017-03-31T14:47:30+5:30
आता वेळ आहे, ती ‘मेरी प्यारी बिंदू’चे भन्नाट टीजर पाहण्याची. होय, आजच या चित्रपटाचे टीजर रिलीज झाले. कुणीही मिस करू नये, असाच हा टीजर आहे.

watch : ‘मेरी प्यारी बिंदू’चा मन मोहून टाकणारा रोमॅन्टिक टीजर!
ब लिवूडमधील ‘प्यारी बिंदू’ची सगळे जण आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत. होय, आम्ही बोलतोय, ते परिणीती चोप्रा हिच्याबद्दल. परिणीतीचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. एकापाठोपाठ एक असे उत्सुकता शिगेला पोहोचवणारे या चित्रपटाचे पोस्टर्स आणि परिणीतीच्या आवाजातील गाणे आपण पाहिले नि ऐकले. आता वेळ आहे, ती ‘मेरी प्यारी बिंदू’चे भन्नाट टीजर पाहण्याची. होय, आजच या चित्रपटाचे टीजर रिलीज झाले. कुणीही मिस करू नये, असाच हा टीजर आहे. या टीजरची सुरुवात होते, ते १९६१ मध्ये आलेल्या एका चित्रपटाच्या गाण्याने. ‘हम दोनो’ या चित्रपटातील अतिशय लोकप्रीय गीत, ‘अभी ना जाओ छोड के...’ कुणीही विसरू शकत नाही. ‘मेरी प्यारी बिंदू’च्या टीजरची सुरुवात होते,ती या गाण्याने. मग एन्ट्री होते ती आयुष्यमान खुराणाची. आयुष्यमान या चित्रपटात एका लेखकाची भूमिका साकारतो आहे. आपल्या टाईपरायटरवर तो बिंदूची कथा उतरवतो आहे. बिंदू त्याच्यात किती भिनलीय, हेच त्याच्या प्रत्येक शब्दागणिक समजतयं. टीजरच्या शेवटी आयुष्यमानचा एक संवाद आहे. अगदी मनाला स्पर्शून जाणारा संवाद. तो संवाद काय, ते तुम्ही स्वत:च ऐकायला हवे.
‘मेरी प्यारी बिंदू’ हा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. यश राज बॅनरची निर्मिती असलेला आणि अक्षय राय दिग्दर्शित हा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. आजच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झालेय. या पोस्टरमध्ये आयुष्यमान स्वत:चे पुस्तक वाचत असताना दिसतोय. तर परिणीती एकदम कलरफुल लूकमध्ये दिसतेय. तिच्या एका हातात रेकॉर्ड आणि दुसºया हातात माईक दिसतोय. एकंदर काय, तर परिणीती व आयुष्यमानच्या चित्रपटाचे हे पोस्टर आणि टीजर प्रेक्षकांची उत्सूकता वाढवणारे आहे.