WATCH : अक्षय कुमार - हुमा कुरेशीची ‘बावरा मन’ केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 14:24 IST2017-01-12T14:23:05+5:302017-01-12T14:24:22+5:30
अक्षय कुमार स्टारर ‘जॉली एलएलबी २’ सिनेमातील दुसरे गाणे ‘बावरा मन’ रिलीज करण्यात आले आहे. सॉफ्ट रोमॅण्टिक प्रकारातील या गाण्यात अक्षय-हुमाची केमिस्ट्री उठून दिसत आहे. तुम्हीदेखील पाहा...

WATCH : अक्षय कुमार - हुमा कुरेशीची ‘बावरा मन’ केमिस्ट्री
‘ ो पागल’सारखे होळीच्या मजेशीर गाण्यानंतर ‘जॉली एलएलबी २’मधील दुसरे गाणे लाँच करण्यात आले आहे. ‘बावरा मन’ नावाचे हे गाणे सॉफ्ट रोमॅण्टिक ट्रॅक असून यामध्ये मुख्य कलाकार अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.
एकदम साधी-सरळ चाल असलेल्या या गण्यातून अक्षय-हुमाच्या दैनंदिन जीवनातील घटना दाखवण्यात आल्या आहेत. गाण्याच्या सुरूवातील गुच्ची ब्रँडचा महागडा ड्रेस विकत न घेऊन दिल्यामुळे नाराज हुमा अक्षयकडे तक्रार करत असते की त्याचे आता तिच्यावर प्रेमच राहिले नाही. त्यावर अक्षय तिला चॅलेंज करतो, पूर्ण लखनऊ शहरात त्याच्यासारखे आपल्या पत्नीसाठी ड्रिंक बनवत असलेला एक तरी पुरुष शोधून दाखवायचा तर मी मानेन.
लखनऊ शहरातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर या गाण्याचे अतिशय सुंदर चित्रिकरण करण्यात आले आहे. अक्षय एक चांगला नवरा, जबाबदार पण तितकाच प्रेमळ वडील दाखवला आहे. गाण्याच्या शेवटी मात्र त्याच्यावर गोळीबार झाल्याचा प्रसंग दाखवून त्यांच्या अयुष्यात काय धोका आहे याची झलक दाखवण्यात आली आहे.
जुबीन नौटियाल आणि नीती मोहन यांच्या मधुर स्वरांनी सजलेल्या या गाण्याला चिरंतन भट्ट यांनी कंपोज केले आहे. कानांना अतिशय मधाळ, छान, प्रसन्न करणाऱ्या संगीतामुळे हे गाणे लक्षात राहण्यासारखे आहे. जुनैद वासी ‘बावरा मन’चे गीतकार आहे. ‘जॉली एलएलबी २’ हा पहिल्या चित्रपटाचा सिक्वेल असून यामध्ये अक्षय-हुमासोबतच अन्नू कपूर आणि सौरभ शुक्ला यांच्यादेखील महत्त्वाच्या भूूमिका आहेत. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
हे गाणे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा.