​हे होते श्रीदेवी यांच्या सौंदर्याचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 16:10 IST2018-02-26T10:40:38+5:302018-02-26T16:10:38+5:30

श्रीदेवी यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या दिसण्याचे देखील कौतुक केले जाते. त्यांच्या दिसण्यावर त्यांचे फॅन्स प्रचंड फिदा होते. वयाची पन्नाशी उलटून ...

This was the secret of Sridevi's beauty | ​हे होते श्रीदेवी यांच्या सौंदर्याचे रहस्य

​हे होते श्रीदेवी यांच्या सौंदर्याचे रहस्य

रीदेवी यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या दिसण्याचे देखील कौतुक केले जाते. त्यांच्या दिसण्यावर त्यांचे फॅन्स प्रचंड फिदा होते. वयाची पन्नाशी उलटून देखील त्या इतक्या सुंदर कशा दिसतात असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडत असे. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाद्वारे दीड दशकानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी पदार्पण केले होते. त्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्यांनी त्यांच्या सौंदर्याचे रहस्य मीडियासोबत शेअर केले होते. श्रीदेवी यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या सौंदर्याचे रहस्य म्हणजे माझे फॅन्स आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांचे माझ्यावर अतोनात असलेले प्रेम हे आहे. तुमचा स्वभाव हा तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो असे मला नेहमी वाटते. तुम्ही आतून जो विचार करता, तोच तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे नेहमी खूश राहा आणि सकारात्मक विचार करा. यातूनच तुमचै सौंदर्य अधिकाधिक खुलेल.
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. 1967 साली त्यांचा एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.
1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना  हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा मॉम हा श्रीदेवीचा चित्रपट शेवटचा ठरला. 

Also Read : फॉरेन्सिक अहवालानुसार या कारणामुळे झाले श्रीदेवी यांचे निधन

Web Title: This was the secret of Sridevi's beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.