जेव्हा रेखा यांनी स्वतःविषयी केला होता हा मोठा खुलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 16:36 IST2017-10-09T11:01:23+5:302017-10-09T16:36:04+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों ...

Was this a great revelation when Rekha did about himself? | जेव्हा रेखा यांनी स्वतःविषयी केला होता हा मोठा खुलासा?

जेव्हा रेखा यांनी स्वतःविषयी केला होता हा मोठा खुलासा?

ंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन अशी त्यांची ओळख. त्यांच्यासह काम करण्यासाठी अनेक कलाकार एका पायावर तयार असतात. जुन्या जमान्यातील नायक असो किंवा आजच्या पीढीतील नवोदित स्टार. प्रत्येक जण रेखा यांचं सौंदर्य, त्यांच्या अदा आणि त्यांच्या अभिनयावर फिदा आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबत एकदा तरी काम करण्याची संधी मिळावी किंवा स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते. त्यांची प्रत्येक अदा आजही तितकीत घायाळ करणारी आहे. 'पहेली है ये जिंदगानी' म्हणत त्यांनी तरुण पीढीला अक्षरक्षा क्लीन बोल्ड केले होते. आजच्या पिढीलाही रेखा यांच्यासह काम करावे असे वाटते.मात्र आणखी एक गोष्ट रेखा यांच्याविषयी एक गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नसावी. ती म्हणजे,चित्रपटसृष्टीला '​मिस्टर नटवरलाल​'​, ​'​उमराव जान​'​ और ​'​सिलसिला​'​ असे एक से बढकर एक सिनेमा देणा-या रेखा यांना मात्र कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते. आज जेव्हा रेखा मागे वळून पाहतात तेव्हा मात्र अभिनयाला करिअर बनवल्यामुळे त्या आज खूप खूश ही आहेत. या अभिनयामुळे आणि सिनेसृष्टीमुळे रेखा यांना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे असंख्य चाहते रेखा यांना मिळाले. 'खून भरी मांग' हा सिनेमा करतेवेळी रेखा यांना त्यांचा अभिनेत्री बनण्याचा निर्णय योग्य वाटला. या सिनेमामुळेच आपण यापेक्षा दुसरं चांगलं काम करूच शकत नसल्याचे रेखा यांना ख-या अर्थाने पटू लागले. चित्रपटसृष्टीत काम करणे हे जणू फक्त त्यांच्यासाठीच होते असे त्यांना वाटू लागले. 

बॉलिवूड... झगमग... चमकणारी ग्लॅमरची दुनिया.... ग्लॅमरस, सुंदर हिरोईन्सची दुनियेत सावळ्या रंगाच्या असून रेखा यांची जादू काही कमी झाली नाही.आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सौदर्यांवरही रसिक फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.बॉलिवूड अभिनेत्री रेखा 63 वर्षाची होणार आहे.रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नई येथे झाला होता. वयाच्या या टप्प्यावरही रेखा फारच ग्लॅमरस दिसता. रेखा यांनी  आपली फिल्मी करीअरची सुरुवात तेलुगु चित्रपट 'रंगुला रत्नम'मधून केली होती. तर 'सावन भादो' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. 

Web Title: Was this a great revelation when Rekha did about himself?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.