राखी सावंतविरोधात अटक वॉरंट; आता काय कांड केले राखीने? वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 17:09 IST2017-04-02T11:25:53+5:302017-04-02T17:09:54+5:30

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा उलट सुलट वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी राखी कोणाचा पाणउतारा करणार ...

Warrant against Rakhi Sawant; Now what has happened in the racket? Read detailed! | राखी सावंतविरोधात अटक वॉरंट; आता काय कांड केले राखीने? वाचा सविस्तर!

राखी सावंतविरोधात अटक वॉरंट; आता काय कांड केले राखीने? वाचा सविस्तर!

लिवूडची आयटम गर्ल राखी सावंत तिच्या अभिनयापेक्षा उलट सुलट वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी राखी कोणाचा पाणउतारा करणार याचा भरवसाच नसतो. बºयाचदा तर तिचे हे बोलबच्चन तिच्या अंगलटही आले आहे. मात्र सुधरणार ती राखी सांवत कसली? असो, सध्या ती अशाच एका वादग्रस्त व्यक्तव्यामुळे अडचणीत सापडली असून, तिच्या विरोधात चक्क अटक वॉरंट काढण्यात आले आहे. 

यावेळेस राखीने भगवान वाल्मीकी आणि त्यांना मानणाºया लोकांविरोधात अपमानजनक वक्तव्य केले आहे. याविषयी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने तिच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. त्यामुळे राखीला आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पंजाबच्या लुधियाना येथील आहे.  

वास्तविक राखीला याच प्रकरणात वारंवार समन्स बजावण्यात आले आहेत; मात्र अशातही ती हजर राहू शकली नाही. त्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले असून, काही पुराव्यांच्या आधारावर तिला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ९ मार्च रोजी झालेल्या सुनवाईदरम्यान पोलिसांनी राखी विरोधात अटक वॉरंट काढत पोलिसांना तिला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांची एक टीम मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. 

राखी विरोधात तक्रार दाखल करणाºया अ‍ॅड. नारिंदर आदिया यांनी म्हटले की, आरोपी कितीही शक्तिशाली असला तरी, न्यायालयापासून स्वत:च बचाव करू शकणार नाही. आदिया यांना विश्वास आहे की, पोलीस राखीला न्यायालयात हजर करतील, तर वरिष्ठ वकील मलविंदर सिंह घुम्मन यांनी म्हटले की, कायदा सगळ्यांसाठी समान असून, पोलीस त्यांचे काम करीत आहेत. 

Web Title: Warrant against Rakhi Sawant; Now what has happened in the racket? Read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.