War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 11:41 AM2019-08-27T11:41:39+5:302019-08-27T11:43:13+5:30

War Movie Trailer : 2 मिनिट 25 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन असून काही तासांतच हा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झालाय.

war trailer hrithik roshan tiger shroff vaani kapoor release date 2 october | War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर

War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर

googlenewsNext
ठळक मुद्देगांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 2 मिनिट 25 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन असून काही तासांतच हा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झालाय.
 काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात टायगर आणि हृतिक गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. पण पुढे टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि सुरु होते ते ‘वॉर’.  टायगर आपल्या गुरूच्याच विरोधात का जातो आणि या वॉरचा शेवट काय होतो, याविषयीची उत्सुकता या ट्रेलरमुळे आता ताणली गेली आहे.


हृतिक आणि टायगर दोघांची जबरदस्त अ‍ॅक्शन आणि तितकेच जबरदस्त डायलॉग मनाला भिडतात. अभिनेत्री वाणी कपूरही ट्रेलरमध्ये दिसते. मात्र ट्रेलरमध्ये तिच्या भूमिकेवरून अद्याप पडदा उठलेला नाही. 
‘वॉर’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झााला आहे. या ट्रेलरनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज पाहायला मिळतेय. जबरदस्त, ब्लॉकबस्टर अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.


 गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला होता की, ‘भारतात आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या अ‍ॅक्शनपटांपेक्षा सर्वोत्तम अ‍ॅक्शनपट आम्हाला तयार करायचा होता. आतापर्यंत जगाने पाहिले नसतील असे  अ‍ॅक्शन सीन डिझाइन केले जावे यासाठी पहिल्यांदा आम्ही जगातील दोन बड्या अ‍ॅॅक्शन कोरिओग्राफरना एकत्र आणले आहे.

Web Title: war trailer hrithik roshan tiger shroff vaani kapoor release date 2 october

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.