​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:35 IST2018-04-23T11:05:16+5:302018-04-23T16:35:16+5:30

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह सध्या जोरात आहे. पवन सिहंचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘वॉन्टेड’कडे लोक डोळे लावून बसले आहेत. याच चित्रपटाचे एक गाणे सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होतेय.

'Wanted' songs, people get crazy, 18 lakh views in 18 hours !! | ​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज!!

​‘वॉन्टेड’च्या ‘या’ गाण्याने लावले लोकांना वेड, १८ तासांत १८ लाख व्ह्युज!!

जपुरी सुपरस्टार पवन सिंह सध्या जोरात आहे. पवन सिहंचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘वॉन्टेड’कडे लोक डोळे लावून बसले आहेत. याच चित्रपटाचे एक गाणे सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होतेय. इतके की, केवळ १८ तासांत या गाण्याला १८ लाखांवर लोकांनी पाहिले.
‘पलंगिया सोने ना दिया...’ असे शब्द असलेले हे गाणे प्रत्येक भोजपुरी चाहत्यांच्या ओठांवर आहे. हे गाणे पवन सिंहचे यंदाचे सर्वाधिक सुपरहिट सॉन्ग म्हणून गणल्या जात आहे. विशेष म्हणजे, हे गाणे स्वत: पवनने गायले आहे. त्याला साथ दिलीयं ती इंदू सोनाली हिने. पवनवरचं चित्रीत या गाण्याने लोकांना वेड लावले आहे.



‘वॉन्टेड’ या चित्रपटात पवन सिंह दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. यंग अँग्री मॅन लूकमध्ये तो दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मणि भट्टाचार्य आणि अमृता आचार्य आहेत. सध्या तरी भोजपुरी चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची क्रेज दिसून येत आहे आणि ही के्रज बघता, ‘वॉन्टेड’ लवकरात लवकर रिलीज करण्याची मेकर्सची योजना आहे. सुजीत कुमार सिंह यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
अगदी अलीकडे पवन सिंह चुकीच्या कारणासाठी चर्चेत आला होता.  पवनने दारूच्या नशेत त्याची को-स्टार अक्षरा सिंह हिला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले होते.पत्रकार शशिकांत सिंह यांनी फेसबुकवर या घटनेचा खुलासा केला होता. सिलवासाच्या एका हॉटेलात ही घटना घडली होती. पवन सिंह व अक्षरा सिंह दोघही एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी येथे होते. अक्षराचे शूटींग पूर्ण झाले होते. त्यामुळे मी मुंबईत परतणार होती. पण बरीच रात्र झाल्याने व गाडी स्वत: ड्राईव्ह करणार असल्याने अक्षराने सकाळी निघण्याची योजना बनवली. त्यामुळे गुरूवारी रात्री ती हॉटेलमध्येच होती. त्या रात्री पवन सिंह दारूच्या नशेत तर्र होता. अशास्थितीत तो आपल्या हॉटेलच्या रूमबाहेर येऊ लागला. अक्षराने त्याला रोखले. मात्र यामुळे पवन सिंहने तिला शिवीगाळ सुरू केली. यावरून दोघांत वाद झाला आणि याचदरम्यान पवन सिंहने अक्षराला मारहाण केली. हॉटेलच्या कर्मचा-यांनी मध्यस्थी करत अक्षराला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण पवन सिंहने अक्षराचे केस पकडून तिचे डोके भिंतीवर आदळले. या मारहाणीत अक्षराच्या हाताला दुखापत झाली होती.

Web Title: 'Wanted' songs, people get crazy, 18 lakh views in 18 hours !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.