‘या’ कारणामुळे वाणी कपूरच्या वडिलांना लवकरात लवकर उरकायचे तिचे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 18:16 IST2017-09-02T12:46:20+5:302017-09-02T18:16:20+5:30

‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘बेफिक्रे’सारख्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देणाºया वाणी कपूरच्या वडिलांनी तिच्या लग्नाची चिंता सतावत आहे, पण का? जाणून घ्या!

Wani Kapoor's father got married soon! | ‘या’ कारणामुळे वाणी कपूरच्या वडिलांना लवकरात लवकर उरकायचे तिचे लग्न!

‘या’ कारणामुळे वाणी कपूरच्या वडिलांना लवकरात लवकर उरकायचे तिचे लग्न!

ुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘बेफिक्रे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तुफान इंटिमेट सीन्स देणाºया अभिनेत्री वाणी कपूरला अजूनही बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. हॉटेल मॅनेजमेंट, मॉडलिंग आणि अभिनेत्री असा प्रवास केलेल्या वाणीला तिच्या बोल्डनेससाठी ओळखले जाते. रणवीर सिंगसोबत तिने ‘बेफिक्रे’ या चित्रपटात ते दाखवून दिले. परंतु हिच बाब तिच्या वडिलांना खटकत आहे. त्यामुळे सध्या ते तिच्या लग्नाचा विचार करीत असून, त्यांनी ‘वर’ शोधायला सुरुवात केली आहे. 

‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणाºया वाणी कपूरने टुरिझममध्ये ग्रॅज्युएट केले आहे. त्यामुळेच तिने चित्रपटांमध्ये येण्याअगोदर हॉटेल इंडस्ट्री ज्वॉइन केली. जेव्हा ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करीत होती, त्याचदरम्यान तिला मॉडलिंगची आॅफर मिळाली. पुढे हाच प्लॅटफॉर्म तिला फिल्म इंडस्ट्रीत घेऊन गेला. पहिल्याच चित्रपटात वाणीने सुशांतसिंग राजपूतसोबत असे काही इंटिमेट सीन्स दिले की, ती प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. वास्तविक या चित्रपटात दोघांमध्ये एक हॉट सीन्स शूट करायचा होता, त्यामुळे वाणी खूपच नर्व्हस होती. मात्र जेव्हा ती सीन्स करायला लागली, तेव्हा ती सुशांतवर भारी पडली. 



त्यानंतर ‘बेफिक्रे’मध्ये वाणीने रणवीर सिंगसोबत बरेचसे इंटीमेट सीन्स दिले. एवढे करूनदेखील वाणीला इंडस्ट्रीत स्वत:ला हवे तसे सिद्ध करता आले नाही. जेव्हा तिचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला तेव्हा वाणी तर निराश झालीच शिवाय तिच्या परिवारातील लोकही निराश झाले. याविषयीचा उलगडा स्वत: वाणीनेच केला होता. तिने एका मुलाखतीत म्हटले होते की, चित्रपट अपयशी ठरत असल्याने माझ्या कुटुंबातील लोक अस्वस्थ आहेत. माझ्या वडिलांच्या मते तर, ‘मुलींनी लवकर लग्न करून संसार थाटायला हवा.’

वाणीच्या वडिलांची इच्छा होती की, तिने चित्रपटांमध्ये काम न करता, लवकर लग्न करावे. मात्र वाणीची आई डिम्पी कपूर यांनीच तिला चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी पूर्ण पाठबळ दिले. तसेच बॉलिवूडमध्ये काम करण्याचे पूर्ण स्वातंत्रही दिले. वाणीची आई एक शिक्षिका होत्या, आता त्या एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत आहेत. वाणीला नूपुर नावाची एक मोठी बहीण असून, ती लग्न करून हॉलंडला सेटल झाली आहे. पण काहीही असो, वाणी बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये यशस्वी होईल काय? हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Wani Kapoor's father got married soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.