बॉलिवूडच्या शतकपूर्तीला वालूकामय ट्रीब्युट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:49 IST2016-01-16T01:16:16+5:302016-02-06T13:49:28+5:30
भारतामध्ये सिनेमाप्रेमींची कमी नाही. चित्रपट हीरोंना डोक्यावर घेऊन देवघरामध्ये बसविणार्यांची संख्यादेखील मोठी आहे. म्हणून तर भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्ष ...

बॉलिवूडच्या शतकपूर्तीला वालूकामय ट्रीब्युट
भ रतामध्ये सिनेमाप्रेमींची कमी नाही. चित्रपट हीरोंना डोक्यावर घेऊन देवघरामध्ये बसविणार्यांची संख्यादेखील मोठी आहे. म्हणून तर भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकजणाने आपापल्या परीने साजरा केला. वाळूवर विविध कलाकृती करणारा आर्टिस्ट राहुल आर्याने त्याच्या खास स्टाईलने बॉलिवूड शतकपूर्तीनिमित्त वाळूशिल्प बनविले आहे. याद्वारे त्याने मोठय़ा पडद्यावरील आजवरच्या अनेक सुवर्णक्षणांना उजाळा दिला आहे. 'राजा हरिशचंद्र'पासून सुरू होणारा हा प्रवास मदर इंडिया, गाईड, शोले, शराबी, मि. इंडिया, अंदाज अपना अपना ते अलिकडच्या बाहुबलीपर्यंत वाळूवर साकारण्यात आला आहे. या कलाकृती बनवित असतानाचा व्हिडियोदेखील त्याने तयार केले आहे. 'शोले'चा धर्मेंद्र काढताना व्हिडियोत 'बसंती इन कुत्ते के सामने मत नाचना' हा डायलॉग ऐकू येतो तर 'डीडीएलजे'च्या शाहरुखच्या वेळी 'बडे बडे देशो में, ऐसी छोटी छोटी बातें..' बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येत असते.