"कोण शाहरुख खान?", विवेक ओबेरॉयचं किंग खानबद्दल वक्तव्य, असं का म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:26 IST2025-11-20T16:26:16+5:302025-11-20T16:26:36+5:30
विवेक ओबेरॉयने बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. किंग खानबद्दल विवेक ओबेरॉय नक्की काय म्हणाला, ते जाणून घेऊया.

"कोण शाहरुख खान?", विवेक ओबेरॉयचं किंग खानबद्दल वक्तव्य, असं का म्हणाला?
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या मस्ती ४ सिनेमामुळे चर्चेत आहे. २१ नोव्हेंबरला विवेकचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या विवेक बिझी आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयने बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. किंग खानबद्दल विवेक ओबेरॉय नक्की काय म्हणाला, ते जाणून घेऊया.
विवेक ओबेरॉयने पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने शाहरुख खानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. २५ वर्षांत शाहरुख खानला सगळे विसरून जातील, असं विवेक ओबेरॉय म्हणाला आहे. "१९६० मध्ये कोणता सिनेमा आला होता. आणि त्यात कोणी काम केलं होतं ते कोणाला माहीत नाही. कोणाला फरकही पडत नाही. गोष्टी इतिहासात जमा होता. २०५०मध्ये कदाचित लोक म्हणतील कोण शाहरुख खान? जसं लोक आज विचारतात कोण राज कपूर? तुम्ही आम्ही त्यांना सिनेमाचा देव म्हणतो. पण, आजच्या पिढीतील रणबीर कपूरच्या फॅनला राज कपूर कोण हे कदाचित माहीत नसेल. त्यामुळे मला असं वाटतं की इतिहासात तुमची किंमत शून्य आहे".
विवेकने केलेल्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. दरम्यान, 'मस्ती ४' सिनेमात विवेक ओबेरॉय, अफताब शिवदासानी, रितेश देशमुख, अमर सक्सेना, प्रेम चावला, श्रेया शर्मा अशी स्टारकास्ट आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या 'मस्ती' या गाजलेल्या सिनेमाचा हा चौथा भाग आहे.