विवान 'दंगल' मध्ये खलनायक ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:14 IST2016-01-16T01:15:33+5:302016-02-13T04:14:24+5:30
टे लीव्हिजन अभिनेता विवान भटेना हा आमीर खान यांच्या 'दंगल' मध्ये खलनायकाची भूमिका साकारतांना दिसणार आहे. ३७ वर्षीय विवान ...

विवान 'दंगल' मध्ये खलनायक ?
ट लीव्हिजन अभिनेता विवान भटेना हा आमीर खान यांच्या 'दंगल' मध्ये खलनायकाची भूमिका साकारतांना दिसणार आहे. ३७ वर्षीय विवान यास आपण सलमान खानच्या होम प्रोडक्शन 'हिरो' मध्ये विलेनच्या रूपात पाहिले आहे. तो म्हणाला,' मी आमीरसोबत दंगल करतोय. माझी भूमिका निगेटिव्ह प्रकारची आहे. पण अद्याप त्याविषयी जास्त काही बोलणार नाही. मी आमीरसोबत एक सीन पूर्ण केला आहे. आणखी बरेच सीन्स पूर्ण करायचे आहेत. मी देखील एका पहेलवानाचीच भूमिका करत आहे. त्यासाठी मी वजन वाढवले आहे. जवळपास दहा किलो वजन वाढवले आहे. तसेच पुढे तो म्हणाला, 'आमीर वजन घटवतोय. तो शेपमध्ये येतोय. तसेच वेगवेगळ्या गोष्टी तो करत असतो. आम्ही आखाड्यामध्ये जवळपास एक महिना ट्रेनिंग घेतली. खर्याखुर्या पहेलवानांकडून आम्ही प्रशिक्षण घेतोय.' विवान 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कुमकूम' नावाच्या शोमध्ये काम केलेले आहे. विवान म्हणतो,' आमीरने कट्टी बट्टी मधील माझ्या कामाचे कौतुक केले आहे, ती गोष्ट माझ्यासाठी आनंददायी आहे. मला वाटतं की मी चांगले काम करेन. मी निगेटिव्ह रोलमध्येही काम करू शकतो. मला माझी जागा हवी होती. '