लग्नाच्या विषयावरून विराट-अनुष्कात बिनसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:08 IST2016-02-09T05:38:29+5:302016-02-09T11:08:29+5:30
विराट कोहली आपल्या लेडी लव्ह अनुष्का शर्माला कोणत्याही परिस्थितीत दूर जाऊ देणार नाही. त्यामुळे विराट आता अनुष्काला समजविण्याचा प्रयत्न ...

लग्नाच्या विषयावरून विराट-अनुष्कात बिनसलं?
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लव्ह स्टोरीत एक नवा ट्विस्ट आला आहे. या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असली तरी अद्याप दोघांकडून कोणताच खुलासा आला नाही. मात्र अनुष्का इतक्यात लग्नाला तयार नसल्याने दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची खंमग चर्चा आहे. विराट आपले रिलेशनशीप टिकविण्यावर भर देणार असल्याचे समजते.
बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहली आपल्या लेडी लव्ह अनुष्का शर्माला कोणत्याही परिस्थितीत दूर जाऊ देणार नाही. त्यामुळे विराट आता अनुष्काला समजविण्याचा प्रयत्न करणार आहे. विराट अनुष्काशी लग्न करण्यास तयार असला तरी अनुष्का सध्याच या प्रस्तावावर विचार करू शकत नसल्याचे समजते. विश्वनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘या दोघांमध्ये अजूनही सारे काही संपलेले नाही. विराट आपले रिलेशनशीप टिकविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत असून अनुष्कासोबतची आपली जोडी कायम रहावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यानच्या काळात विराटने अनुष्कासोबत हॉलिडे प्लॉन केला होता मात्र याच वेळी दोघांत कोणत्या तरी कारणाहून बिनसले, हा विषय लग्नाचा असू शकतो असे सांगण्यात येत आहे. अनुष्काचे करिअर सध्या चढतीवर असल्याने ती कोणतिही रिस्क घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली होती.