Viral Video : जेव्हा दीपिकाला राखीने विचारले, ‘शरीराचा कोणता पार्ट दाखवू इच्छिते?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 13:04 IST2017-11-25T07:34:55+5:302017-11-25T13:04:55+5:30

शोची होस्ट राखी सावंत तिला प्रश्न विचारते की, ‘तू तुझ्या शरीराचा कोणता पार्ट लोकांना दाखवू इच्छिते?’ हा इंटरव्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून दीपिका पुन्हा वादात सापडते की काय, असे वाटू लागले आहे.

Viral Video: When Rakhi asked Deepika, 'What part of the body do you want to show?' | Viral Video : जेव्हा दीपिकाला राखीने विचारले, ‘शरीराचा कोणता पार्ट दाखवू इच्छिते?’

Viral Video : जेव्हा दीपिकाला राखीने विचारले, ‘शरीराचा कोणता पार्ट दाखवू इच्छिते?’

लिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण संजय लीला भंसालीच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून वादात सापडली आहे. करणी सेना आणि राजकीय संघटनांद्वारा विरोध झाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन थांबले आहे. याच दरम्यान नुकताच दीपिकाचा जुन्या इंटरव्यूचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात शोची होस्ट राखी सावंत तिला प्रश्न विचारते की, ‘तू तुझ्या शरीराचा कोणता पार्ट लोकांना दाखवू इच्छिते?’ हा इंटरव्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून दीपिका पुन्हा वादात सापडते की काय, असे वाटू लागले आहे.  

‘द राखी सावंत शो’ची गेस्ट बनलेली दीपिकाचा काही वर्षांपूर्वी राखी सावंतने हा इंटरव्यू घेतला होता. मात्र दीपिकाने राखीच्या या प्रश्नाचे चटपटे उत्तर देऊन पे्रक्षकांचे मन जिंकले होते. विचारलेल्या या प्रश्नावर दीपिका विचार करुन उत्तर देताना म्हटली की, मी माझ्या शरीरावरची ‘स्माइल’ दाखविणे पसंत करेल.    
राखी हे उत्तर ऐकून मात्र एकदमच दचकते आणि म्हणते की, ‘स्माइल शरीराचा कोणताच पार्ट नाही’, तेव्हा दीपिका म्हणते की, ‘माझी जीभ तर माझ्या शरीराचा पार्ट आहे.’   
 
राखी सावंतने हा व्हिडिओ तीन दिवसापूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओवर यूजर्सने दीपिकाची प्रशंसा केली आहे, आणि राखीच्या अशा प्रश्नाची मजाक केली आहे. एका यूजर्सने लिहिले आहे की, ‘दीपिकाचे उत्तर खूपच क्लासी आहे.’  

‘पद्मावती’ सिनेमामुळे चर्चेत आलेल्या दीपिका पादुकोणला राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे. ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी दिला आहे.

मेरठच्या एका राजपूत नेत्याने भन्साळींविरोधात फतवा काढला आहे. भन्साळींचे शिर आणून देणऱ्यास पाच कोटींचे इनाम देऊ, असे या नेत्याने म्हटले आहे. यानंतर भन्साळींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राजपूत सेनेच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये,पद्मावती चित्रपटाची तिकीट काढण्यापूर्वी स्वत:चा विमा काढून घ्या. कारण, राजपूत शिरच्छेद करताना विचार करत नाहीत, असे लिहिलेयं.

‘पद्मावती’ चि़त्रपटावर बंदी घातली पाहिजे. चित्रपट सृष्टीला कुठली अस्मिता किंवा राष्ट्रवादाशी काही देणे घेणे नाही. त्यांना फक्त पैसा हवा आहे. यासाठी ते नग्न नाचण्यासही तयार होतील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे.  


 

Web Title: Viral Video: When Rakhi asked Deepika, 'What part of the body do you want to show?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.