Viral Video: हे काय? फाटलेली जीन्स आणखी फाडली अन् चघळू लागला सलमान खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 15:42 IST2017-06-01T10:12:38+5:302017-06-01T15:42:38+5:30

सलमान खान एक सुपरस्टार आहे आणि त्याचे चाहते त्याची प्रत्येक सवय फॉलो करण्यास आतूर आहेत. पण सलमानची एक सवय तुम्ही फॉलो करूच शकणार नाही.

Viral Video: What Is It? The torn genes got torn down and started fluttering Salman Khan! | Viral Video: हे काय? फाटलेली जीन्स आणखी फाडली अन् चघळू लागला सलमान खान!

Viral Video: हे काय? फाटलेली जीन्स आणखी फाडली अन् चघळू लागला सलमान खान!

मान खान एक सुपरस्टार आहे आणि त्याचे चाहते त्याची प्रत्येक सवय फॉलो करण्यास आतूर आहेत. पण सलमानची एक सवय तुम्ही फॉलो करूच शकणार नाही. होय, सध्या सलमानचा एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत सलमानची एक विचित्र सवय तुम्ही पाहू शकाल.

 

हा व्हिडिओ अगदी ताजा आहे. म्हणजेच सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या आगामी सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमधला आहे. या इव्हेंटमध्ये सलमान रिप्ड डेनिम (फाटलेली जीन्स) घालून पोहोचला होता. कदाचित इव्हेंट सुरु व्हायला वेळ असावा. मग या फावल्या वेळेत सलमानने काय केले माहितीये? बसल्या बसल्या सलमानने त्याची फाटलेली जीन्स आणखीच फाडली अन् मग तिथेच जीन्सचे तुटून हातात आलेले धागे चावायला लागला. सध्या सलमानचा हा व्हिडिओ लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलाय.
लोकांना हा व्हिडिओ आवडतोय, सोबतच यासाठी सलमानची टरही उडवली जातेय. खुद्द सलमानही स्वत:चे हे रूप पाहून कदाचित हसू रोखू शकणार नाही. 
सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाची लोक आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाईट’ एक वॉर ड्रामा मुव्ही आहे. १९६२मध्ये भारत-चीनदरम्यान झालेल्या युद्धादरम्यानची कथा यात साकारली आहे. सलमानशिवाय या चित्रपटात चीनी अभिनेत्री झू झू, सोहेन खान आणि दिवंगत ओम पुरी यांच्या मुख्य भूमिका आहेत.सलमान सध्या ‘ट्यूबलाईट’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ईदला रिलीज होणाºया ‘ट्यूबलाईट’या चित्रपटात सलमानने लक्ष्मण नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. लक्ष्मणला प्रत्येक गोष्ट समजून घेण्यास उशीर लागत असल्याने त्याला ‘ट्यूबलाईट’ असे संबोधले जाते.  

Web Title: Viral Video: What Is It? The torn genes got torn down and started fluttering Salman Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.