​ विनोद खन्ना यांना ओळखणेही झाले कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 11:41 IST2017-04-06T06:11:23+5:302017-04-06T11:41:23+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना गत शुक्रवारी रात्री रूग्णालयात दाखल केल्याची बातमी आली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ...

Vinod Khanna is also known hard! | ​ विनोद खन्ना यांना ओळखणेही झाले कठीण!!

​ विनोद खन्ना यांना ओळखणेही झाले कठीण!!

लिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना गत शुक्रवारी रात्री रूग्णालयात दाखल केल्याची बातमी आली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. खरे तर काहीही गंभीर नसल्याचे विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्ना याने स्पष्ट केले. पण रूग्णालयातील फोटो बघितल्यावर विनोद खन्ना यांना ओळखणेही कठीण आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत विनोद खन्ना कमालीचे अशक्त दिसत आहेत. सूत्रांच्या मते, विनोद खन्ना यांना ब्लॅडर कॅन्सर झाला आहे. अर्थात या बातमीला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.



ALSO READ : विनोद खन्ना रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर!!

गत शुक्रवारी शरिरातील पाणी कमी झाल्यामुळे विनोद खन्ना यांना   रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॅड आता एकदम ठणठणीत असून त्यांना लवकरच रूग्णालयातून सुटी मिळेल, असे  विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्ना याने सांगितले आहे. रूग्णालयाचे व रूग्णालयातील स्टाफचेही त्याने आभार मानलेत. गेल्या गुरुवारी विनोद खन्ना यांच्या आगामी ‘एक राणी ऐसी भी’चे ट्रेलर लॉचिंगचा इव्हेंट ठेवण्यात आला होता. या इव्हेंटसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महानायक अमिताभ बच्चन उपस्थित होते. असे म्हटले जात आहे की, प्रकृती अस्वास्थ्य असल्याकारणानेच विनोद खन्ना या इव्हेंटला उपस्थित राहू शकले नाहीत. 

विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’,‘कुर्बानी’,‘पूरब और पश्चिम’,‘रेशमा और शेरा’,‘हाथ की सफाई’,‘हेराफेरी’ अशा अनेक चित्रपटांत शानदार अभिनय केला.  विनोद खन्नाच्या कारकिर्दीची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेने झाली होती. पण नंतर  विनोद खन्ना हिरो म्हणून नावारूपास आलेत. १९७१ मध्ये ‘हम तुम और वो’मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली. विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. अलीकडे शाहरूख खान व काजोल स्टारर ‘दिलवाले’ या चित्रपटात ते दिसले होते.

Web Title: Vinod Khanna is also known hard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.