‘तापसीसोबत इंटिमेट सीन देताना अशी झाली होती विक्रम मेस्सीची अवस्था, त्यानेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 07:33 PM2021-07-09T19:33:08+5:302021-07-09T19:38:16+5:30

विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे आणि तापसी पन्नू सध्या त्यांच्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळं चर्चेत आहेत.

Vikrant Massey breaks silence on intimate scene With Tapsee Pannu in Haseen Dilruba Movie | ‘तापसीसोबत इंटिमेट सीन देताना अशी झाली होती विक्रम मेस्सीची अवस्था, त्यानेच केला खुलासा

‘तापसीसोबत इंटिमेट सीन देताना अशी झाली होती विक्रम मेस्सीची अवस्था, त्यानेच केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे आणि तापसी पन्नू सध्या त्यांच्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटामुळं चर्चेत आहेत. सिनेमाविषयी बोलताना विक्रम मेस्सीने त्याच्या अनुभवाविषयी काही गोष्टी सांगितल्या. सिनेमात पहिल्यांदाच त्याने तापसी पन्नू सोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच इंटिमेट सीन्समुळे तो चर्चेत होता. याविषयी त्याला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्या आला की, असे सीन्स देताना घाबरला होतास का ?यावर त्याने उत्तर दिले की,  तापसी ही नेहमी हसत असते. पण खरंतर आम्हीसगळेच  कामाच्या बाबतीत खूप प्रोफेशनल होतो.

दिग्दर्शकाला हवे तसे सीन्स परफेक्ट देण्याकडेच आमचे लक्ष असायचे. आणि आमचे खूप चांगले ट्युनिंग जमल्यामुळे इंटिमेट सीन्स करताना अजिबात दडपण आले नव्हते.  विक्रांत मेस्सी, हर्षवर्धन राणे आणि तापसी पन्नू याच्या भूमिकांना त्यांनी उत्तम न्याय दिल्याचे तुम्हालाही जाणवेल हा एक लव्ह ट्रँगल असल्यामुळे शेवटपर्यंत रसिक सिनेमाला खिळून राहतात. 


दिलेल्या मुलाखतीत मध्ये विक्रांतने एक किस्सा सांगितला होता. त्या किस्स्यामुळेही तो प्रचंड चर्चेत होता. विक्रांतने सांगितले की, आजीकडे राहायला गेलो होते. तेव्हा तेथे माझे चुलत भाऊ देखील आले होते. आम्ही एकदा अडल्ट फिल्म पाहात होतो आणि तेवढ्यात मावशी तेथे आली. आम्ही कधी विचारही केला नव्हता की मावशी सकाळी ३ वाजता उठेल आणि आमच्या खोलीमध्ये येईल.

 

त्यानंतर आम्हाला इतकी लाजेरवाणे वाटले की आम्ही तेथून निघून गेलो’ असे विक्रांत म्हणाला. घरात असताना जेव्हा जेव्हा मावशी समोर यायची तेव्हा मला तिच्याकडे बघताना लाज वाटायची. तिच्याकडे मान वर करुनही बोलण्याची माझी हिंमत नसायची. 

Web Title: Vikrant Massey breaks silence on intimate scene With Tapsee Pannu in Haseen Dilruba Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.