ठरला! ‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू ठरला!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 11:51 IST2018-12-23T11:50:56+5:302018-12-23T11:51:15+5:30
होय, रणवीर सिंगच्या या चित्रपटातून साऊथ सेन्सेशन ‘अर्जुन रेड्डी’ स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

ठरला! ‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू ठरला!!
‘सिम्बा’ या चित्रपटानंतर रणवीर सिंग ‘83’ या आगामी चित्रपटात बिझी होणार आहे. भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात रणवीर सिंग भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देवची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, ही बातमी ऐकून चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. होय, रणवीर सिंगच्या या चित्रपटातून साऊथ सेन्सेशन ‘अर्जुन रेड्डी’ स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड डेब्यू करणार आहे. ट्रेड एॅनानिस्ट रमेश बालाने ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
Actor @TheDeverakonda set to play Cricketer #KrishSrikanth in 1983 India's World Cup winning sage "1983"
— Ramesh Bala (@rameshlaus) December 22, 2018
Will be his #Bollywood debut.. @RanveerOfficial plays #KapilDevpic.twitter.com/5epSBhHSFb
विजय देवरकोंडा अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, टॅक्सीवाला असे साऊथच्या सुपरहिट चित्रपटात दिसला आहे. एकापाठोपाठ एक हिट देणा-या विजय देवरकोंडाला बॉलिवूड चित्रपट घेण्यास अनेक दिग्दर्शक उत्सूक होते. यासगळ्यांत अखेर दिग्दर्शक कबीर खान यांनी बाजी बाजली.
You again ❤
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) November 17, 2018
While you fill the theatres with your laughter 😀
I decided to become your driver 🚖
A glimpse of what we did. #VijayBeMyTaxiwaalapic.twitter.com/QNABafPGgr
अलीकडे ‘कॉफी विद करण 6’मध्ये करण जोहर व जान्हवी कपूर दोघेही विजय देवरकोंडाची स्तूती करताना दिसले होते. यानंतर करण जोहर विजय देवरकोंडाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता कबीर खानदिग्दर्शित ‘83’मधून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार, हे ठरलेय. या चित्रपटात तो कृष श्रीकांत यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.
१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला; तो क्षण आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात जिवंत आहे. त्यामुळेच दिग्दर्शक कबीर खानने काही दिवसांपूर्वी १९८३ च्या वर्ल्ड कपवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली आणि प्रत्येकाचा आनंद गगणात मावेनासा झाला. आता चित्रपटात रणवीर व विजय देवरकोंडाची जोडी म्हटल्यावर चाहते आणखी खूश्श होणार, हे नव्याने सांगणे नकोच.