'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 11:29 AM2022-08-20T11:29:15+5:302022-08-20T11:47:52+5:30

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉयकॉट बॉलीवूड सतत ट्विटरवर ट्रेंड होतो आहे, या बॉयकॉट ट्रेंडवर आता विजय देवरकोंडाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Vijay Deverakonda reacts to Aamir Khan boycott Laal Singh Chaddha trend know what he said | 'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

'बॉयकॉट'चा फटका फक्त आमिर खानला बसत नाही, हजारो कुटुंबांचं नुकसान होतं; विजय देवरकोंडाने गणित मांडलं

googlenewsNext

बॉलिवूड इंडस्ट्री सध्या संकटात आहे. बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक सिनेमे आपटत आहेत.. बॉयकॉट बॉलीवूड सतत ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि प्रत्येक नवीन बॉलिवूड चित्रपटावर या हॅशटॅगने बहिष्कार टाकला जात आहे. #Boycott ट्रेंडचा फटका आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'ला बसला.  बॉयकॉट ट्रेंडवर बॉलिवूडमधील अनेक कलाकर संतापले आहेत. आता साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाने बॉयकॉटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला विजय देवरकोंडा ?
रिपोर्टनुसार बॉयकॉट ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया देताना विजय देवराकोंडा म्हणाला की, मला वाटते की चित्रपटाच्या सेटवर अभिनेता, दिग्दर्शक आणि अभिनेत्रींशिवाय इतरही अनेक महत्त्वाचे लोक असतात. एका चित्रपटावर 200-300 कलाकार काम करतात आणि आमच्या सर्वांचे स्टाफ मेंबर्सदेखील असतात, त्यामुळे चित्रपट अनेक लोकांना काम देतो.  अनेकांच्या उपजीविकेचे साधन असतं.

पुढे अभिनेता म्हणाला, जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेता, तेव्हा याचा परिणाम केवळ त्या अभिनेत्यावरच होत नाही, तर संबंधीत हजारो कुटुंबावर होता. त्यांना यामुळे त्यांची  रोजीरोटी गमवावी लागते. आमिर खान हा थिएटरकडे गर्दी खेचतो. हा बहिष्कार का होत आहे हे मला माहीत नाही, पण जे काही गैरसमज होत आहेत, त्याचा परिणाम आमिर खानवर नाही तर अर्थव्यवस्थेवर होतो आहे हे लक्षात घ्या. 

यााधी अर्जुन कपूरही बॉयकॉट ट्रेंडवर संतापला
"आता संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला एकत्र येऊन याविरोधात लढा द्यावा लागणार. कारण हे दिवसागणिक वाढत चाललंय. आता ट्रोलर्सला उत्तर देण्याची वेळ आली आहे. इंडस्ट्रीतले आम्ही लोक शांत राहिलो, कदाचित इथेच आमचं चुकलं. आम्ही विनम्रता दाखवली आणि ट्रोलर्सने याचा फायदा घेतला. जे मनात येईल ते लोक बोलत आहेत. मला विचाराल तर आमचं काम बोलेल, आम्ही ट्रोलर्सच्या कमेंट्सवर रिअ‍ॅक्ट करून खालची पातळी का गाठायची, असं माझं मत होतं. पण आता अति झालं आहे. बॉलिवूडला बायकॉट करण्याचा ट्रेंड लोकांची सवय बनू लागली आहे. आम्हा सर्वांना एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.कारण लोक आमच्याबद्दल बोलत आहेत. हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्यांना रिअ‍ॅलिटीची काहीही देणंघेणं नाही. आम्ही एखादा सिनेमा करतो, तो बॉक्सऑफिसवर चालला तर लोक आम्हाला डोक्यावर घेतात. पण ते आमच्या आडनावामुळे नाही तर आमच्या कामामुळे. पण आता लोक ज्या पद्धतीने वागत आहेत ते अजिबात खपवून घेण्यासारखं नाही", असं अर्जुन म्हणाला होता.
 

Web Title: Vijay Deverakonda reacts to Aamir Khan boycott Laal Singh Chaddha trend know what he said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.