View Pics : आजी बबिताच्या घरून परतला शहजादा तैमूर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 21:30 IST2017-06-17T16:00:52+5:302017-06-17T21:30:52+5:30

करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा शहजादा तैमूर सर्वाधिक चर्चेत असलेला स्टार किड्स आहे. त्याचा एक जरी ...

View Pics: grandfather's family returns home Prince Tiemur !! | View Pics : आजी बबिताच्या घरून परतला शहजादा तैमूर!!

View Pics : आजी बबिताच्या घरून परतला शहजादा तैमूर!!

िना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा शहजादा तैमूर सर्वाधिक चर्चेत असलेला स्टार किड्स आहे. त्याचा एक जरी फोटो समोर आला तरी, तो दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेत असतो. आमच्याकडे तैमूरचे असेच काही लेटेस्ट फोटो समोर आले असून, ते बघून नक्कीच तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल. कारण फोटोमध्ये तैमूर खूपच गोंडस दिसत असून, त्याचा लळा लागल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक तैमूरला आईप्रमाणेच आपल्या मित्रांकडे आणि नातेवाइकांकडे जाणे आवडते. तैमूर नुकताच आजी बबिताच्या घरी गेला होता. तेथून परतत असताना त्याचे काही फोटोज कॅमेºयात कैद झाले आहेत. 





वास्तविक पतौडी परिवाराबरोबरच कपूर परिवारदेखील तैमूरशिवाय एक क्षण राहू शकत नाही. प्रत्येकालाच त्याचा लळा लागलेला आहे. त्यामुळे तो नेहमीच कधी आजी, तर कधी मामाकडे जात असतो. आज आजीच्या घरून परतत असताना तो स्पॉट झाला आहे. खरं तर आजचा दिवस बॉलिवूड चाहत्यांसाठी खरोखरच स्पेशल राहिला आहे. कारण या अगोदर आम्ही तुम्हाला राणी मुखर्जी हिच्या लाडक्या आदिराची झलक दाखविली होती. फोटोमध्ये राणी आणि तिची चिमुकली खूपच सुंदर दिसत होते. आता आम्ही तुम्हाला चिमुकल्या तैमूरचे फोटो दाखवित असून, फोटो बघून तुमचा दिवसभराचा थकवा नक्कीच जाईल याची आम्हाला खात्री आहे. 





तैमूरची आजी बबिताविषयी सांगायचे झाल्यास, त्या दोन्ही मुली म्हणजेच करिना आणि करिष्माच्या घरापासून काहीच अंतरावर राहतात. ज्यामुळे त्यांना तैमूरसोबत वेळ घालविण्यात फारशा अडचणी येत नाहीत. तैमूरलादेखील आजीसोबत राहायला आवडत असल्याने तो नेहमीच आजीकडे येत असतो. आजीकडे तो चांगला रमत असल्याने मम्मी करिनादेखील निश्चिंत राहत असते. 



दरम्यान, तैमूरचे हे फोटो आता सोशल मीडियावरही व्हायरल होत असल्याने तो किती फेमस होत आहे याचा अंदाज बांधणे सहज शक्य होते. अखेरीस तैमूर त्याचा मित्र तुषारचा मुलगा लक्षच्या बर्थ डे पार्टीत मम्मी करिनासोबत सहभागी झाला होता. त्यावेळी तैमूरच सगळ्यांचे आकर्षण होता. माध्यमांमध्ये तैमूरचे फोटो वाºयासारखे पसरले होते. लक्ष आणि तैमूरची मैत्री त्यावेळी चर्चेत राहिली होती. आता तैमूरचे असेच काहीसे फोटो समोर आले असून, ते बघून तुम्ही तैमूरच्या नक्कीच प्रेमात पडाल. 

Web Title: View Pics: grandfather's family returns home Prince Tiemur !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.