View Pic : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने शेअर केला हॉट फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 20:16 IST2017-06-17T14:45:49+5:302017-06-17T20:16:05+5:30

​अभिनेत्री दिशा पाटनी हिने अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये व्यवस्थितरीत्या पाउलही ठेवले नाही; मात्र सोशल मीडियावरील तिचा जलवा असा काही आहे की बघणारे थक्क झाले आहेत.

View Pic: Tiger Shroff's Girlfriend Direction shared with Katni Hot Photo !! | View Pic : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने शेअर केला हॉट फोटो!!

View Pic : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने शेअर केला हॉट फोटो!!

िनेत्री दिशा पाटनी हिने अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये व्यवस्थितरीत्या पाउलही ठेवले नाही; मात्र सोशल मीडियावरील तिचा जलवा असा काही आहे की बघणारे थक्क झाले आहेत. दिशाला फॉलो करणाºया यूजर्सना हे लगेचच लक्षात येईल की, आम्ही असं का म्हणत आहोत. दिशाने नुकताच तिचा ‘बर्थ डे’ सेलिब्रेट केला आहे. ज्याकरिता तिच्यावर जगातील कानाकोपºयातून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. त्यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे आभारही मानले होते. आता पुन्हा एकदा दिशाने इन्स्टावर एक हॉट फोटो शेअर केला असून, त्याला करोडो लोकांकडून कॉमेण्ट्स मिळत आहेत. 

अभिनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी दिशा पाटनी नुकतीच सुट्या एन्जॉय करण्यासाठी एका खास ठिकाणी गेली होती. त्याठिकाणी दिशाने फोटोशूट केले असून, त्यातील एक हॉट फोटो तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. स्विमसूट परिधान केलेली दिशा खूपच हॉट दिसत आहे. नीळ्या समुद्राच्या किनाºयावर उभा राहून घेतलेल्या या फोटोत दिशाचा हॉट अंदाज घायाळ करणारा आहे. 
 

फोटो शेअर करताना दिशाने लिहिले की, ‘टेक मी टू द सी’ म्हणजे ‘मला समुद्राच्या जवळ घेऊन जा’ आता दिशाने हे कोणाला उद्देशून म्हटले हे मात्र कोडेच म्हणावे लागेल. परंतु तसा विचार केला तर ती तिच्या स्वप्नातील राजकुमारालाच (टायगर श्रॉफ) उद्देशून म्हणत असावी. काही दिवसांपूर्वीच दिशा टायगर श्रॉफसोबत बघावयास मिळाली होती. टायगरची बहीण कृष्णासोबत दिशाचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी पोहोचला होता, तेव्हा दोघांनी क्वालिटी टाइम व्यतित केला होता. 

असो, जर दिशाने ही मागणी टायगरला केली असेल तर लवकरच कदाचित तिची ही मागणी पूर्ण होईल. ती कशी होईल याबाबतची अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोतच. असो, दिशाच्या फिल्मी करिअरविषयी सांगायचे झाल्यास तिने ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून कोट्यवधी लोकांची मने जिंकली. आता ती टायगर श्रॉफच्या ‘बागी-२’मध्ये बघावयास मिळणार असून, लवकरच त्याच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. 

Web Title: View Pic: Tiger Shroff's Girlfriend Direction shared with Katni Hot Photo !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.