​विद्या बनणार कमला सुरैय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 08:31 IST2016-03-13T15:31:49+5:302016-03-13T08:31:49+5:30

बॉलिवूडमध्ये आणखी एका बायोपिकची तयारी सुरु असून अभिनेत्री विद्या बालन या नव्याकोºया बायोपिकमध्ये दिसणार आहे. मल्याळम दिग्दर्शक कमल हे ...

Vidya Banar Kamala Suraiyya | ​विद्या बनणार कमला सुरैय्या

​विद्या बनणार कमला सुरैय्या

लिवूडमध्ये आणखी एका बायोपिकची तयारी सुरु असून अभिनेत्री विद्या बालन या नव्याकोºया बायोपिकमध्ये दिसणार आहे. मल्याळम दिग्दर्शक कमल हे सुप्रसिद्ध इंग्रजी लेखिका कमला सुरैय्या यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा घेऊन येत आहे. मल्याळम आणि इंग्रजी असा हा द्विभाषी चित्रपट असेल. कमला सुरैय्या यांनी कमला दास या नावाने इंग्रजीत लेखन केले. शिवाय माधवीकुट्टी या नावाने मल्याळम साहित्यातही आपले योगदान दिले. अत्यंत धाडसी, निर्भीड आणि पारंपरिक विचारांना छेद देणारे लिखाण त्यांनी केले. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करून आपले नाव कमला सुरैय्या असे ठेवले. कमला सुरैय्या यांच्या आयुष्यावरील वास्तववादी चित्रपट घेऊन येण्याचा कमल यांचा मनोदय आहे. येत्या आक्टोबरमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु होणे अपेक्षित आहे. ‘एंते कथा’(माझी कहानी) हे कमला सुरैय्या यांचे सर्वाधिक गाजलेले पुस्तक आहे. याशिवाय ‘चाईल्ड मेमॉयर्स’, ‘समर इन कॅलकटा’, ‘अल्फाबेट आॅफ लस्ट’ आदी त्यांच्या गाजलेला रचना आहेत.

Web Title: Vidya Banar Kamala Suraiyya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.