​विद्या बालनच्या ‘बेगम जान’ची रिलीज डेट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 14:23 IST2017-02-11T11:09:06+5:302017-02-12T14:23:34+5:30

आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन हिचा आगामी बेगम जान ...

Vidya Balan's 'Begum Jan' release release date | ​विद्या बालनच्या ‘बेगम जान’ची रिलीज डेट जाहीर

​विद्या बालनच्या ‘बेगम जान’ची रिलीज डेट जाहीर

ल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन हिचा आगामी बेगम जान या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, रजत कपूर व गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला बेगम जान हा चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी याने केले असून हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. निर्माता महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला बेगम जानच्या माध्यमातून दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी बॉलिवूडमध्ये पर्दापण करतो आहे. 

अभिनेत्री विद्या बालन हिने ट्विटरवर एक फोटो शेअर करताना बेगम जानच्या रिलीजची तारीखेचा खुलासा केला. विद्याने लिहले हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज होणार असल्याचे सांगितले. हा चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज केला जाणार होता मात्र काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट निर्मात्यांनी पुढे ढकलली होती. ‘राजकहानी’ या बंगाली चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘बेगम जान’ या चित्रपटाचे कथानक ऐतिहासिक पाश्वभूमीवर आधारित आहे. 

स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या फाळणीकाळातील ही कथा आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान देहविक्रय व्यवसायात फसलेल्या महिलांच्या आयुष्यातील उलथा-पालथ या चित्रपटातून पडद्यावर दिसणार आहे. सर्वात विशेष म्हणजे, यात एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ अभिनेत्री दिसणार आहे. सेन्सॉर बोडार्ने या चित्रपटास ‘ए’ प्रमाणपत्रासह पास केले असल्याची खबर आहे. असे यासाठी कारण चित्रपटाची कथा एका कुंठणखान्याच्या अवती-भवती फिरणारी आहे. यातील काही शब्दांवर सेन्सॉर बोडार्ने आक्षेप नोंदवल्याचीही चर्चा आहे.

‘बेगम जान’ या चित्रपटाचे संगीत अनू मलिक यांनी दिले असून सोनू निगम, राहत फतेह अली खान, श्रेया घोषाल या गायकांसोबतही त्यांनी रेकॉडिंग केले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी बेगम जान या चित्रपटात एक गाणे गायले आहे. हे गाणे या चित्रपटाचे आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Vidya Balan's 'Begum Jan' release release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.