​विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’चे ‘हवा हवाई २.०’ गाणे रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 15:10 IST2017-10-26T09:40:22+5:302017-10-26T15:10:22+5:30

विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटातील ‘हवा हवाई २.०’ पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

Vidya Balan's 'Aap Ki Sulu' air air 2.0 song is released! | ​विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’चे ‘हवा हवाई २.०’ गाणे रिलीज!

​विद्या बालनच्या ‘तुम्हारी सुलू’चे ‘हवा हवाई २.०’ गाणे रिलीज!

द्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही जरा बारकाईने पाहिला असेल तर त्यात श्रीदेवीचे सुपरहिट गाणे ‘हवा हवाई’ची ट्यून तुम्ही ऐकली असेल. यानंतर विद्याच्या या चित्रपटातील ‘हवा हवाई २.०’ पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.



आज ही प्रतीक्षा संपलीय. होय, ‘तुम्हारी सुलू’मधील  ‘हवा हवाई’चे नवे व्हर्जन रिलीज झाले आहे. हे गाणे श्रीदेवी व अनिल कपूर यांच्या सुपरडुपर हिट ‘मिस्टर इंडिया’तील ‘हवा हवाई’ गाण्याचा रिमेक आहे. अर्थातच हे नवे व्हर्जन पाहिल्यानंतर ते  तुम्हाला कसे वाटले, हे तुम्ही आम्हाला कळवणार आहात. पण  आम्हाला विचाराल तर ‘हवा हवाई २.०’मध्ये आम्हाला कुठलाही ताजेपणा दिसला नाही. ‘हवा हवाई २.०’ गाणे पाहिल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला लगेच लक्षात येईल, ते म्हणजे यात सुमारे ५० टक्के तेच शॉट्स आहेत, जे आपण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आधीच पाहिले आहेत. विद्या बालन, नेहा धूपिया आणि मलिष्का या तिघींचा प्रभावही फारसा जाणवत नाही. एकंदर काय तर विद्या बालनचे हे गाणे प्रेक्षकांना नवे काही देण्यात अपयशी ठरले आहे. अर्थात तुमचे मत आमच्यापेक्षा वेगळे असू शकते.



ALSO READ: विद्या बालनसोबत लोकलमध्ये घडला होता ‘हा’ किळसवाणा प्रकार!

तनिष्क बागजीने या गाण्याची प्रोग्रामिंग करताना फार छेडछाड केलेली नाही. ‘हवा हवाई’ या ओरिजनल गाण्याचे संगीत आणि आवाज तोच आहे आणि कदाचित हीच या गाण्याची सर्वात मोठी कमजोरी भासतेय. ज्यांनी श्रीदेवीचे व्हर्जन पाहिलेय, ऐकलेय, त्यांना विद्याच्या या गाण्यात फार काही वेगळे जाणवणार नाही. तुम्हीही बघा आणि या गाण्याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
विद्या या चित्रपटात एका रेडिओ जॉकीच्या भूमिकेत आह . रात्रीचा शो होस्ट करणारी आरजेची कथा यात आपण पाहणार आहोत. यापूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात विद्या आरजेच्या भूमिकेत दिसली होती.

Web Title: Vidya Balan's 'Aap Ki Sulu' air air 2.0 song is released!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.