विद्या बालनने स्वत:ला म्हटले, ‘निर्लज्जम सदा सुखी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:58 IST2017-11-16T11:28:02+5:302017-11-16T16:58:02+5:30

विद्या बालन सध्या तिच्या बिंधास्त वक्तव्यांमुळे भलतीच चर्चेत आहे. आता तिने स्वत:ला ‘बेशर्म’ असे म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर!

Vidya Balan herself said, 'Nirjajam is always happy'! | विद्या बालनने स्वत:ला म्हटले, ‘निर्लज्जम सदा सुखी’!

विद्या बालनने स्वत:ला म्हटले, ‘निर्लज्जम सदा सुखी’!

द्या बालन सध्या तिच्या ‘तुम्हारी सुलु’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने अनेक वादग्रस्त वक्तव्य करून स्वत:ला चर्चेत ठेवले. त्यातीलच तिने केलेले एक वक्तव्य म्हणजे स्वत:ला ‘बेशर्म’ (निर्लज्ज) म्हणणे हे होय. तिच्या या वक्तव्यावर विद्याने नुकतेच स्पष्टीकरण दिले आहे. विद्याने एका मुलाखतीदरम्यान स्वत:ला ‘बेशर्म’ असे म्हटले होते. फिल्म सिटीमध्ये गुलशन कुमारच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या उद्घाटन समारंभात पोहोचलेल्या विद्याने तिच्या याच वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. 

त्याचे झाले असे की, विद्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरत आहेत. तिच्या या चित्रपटांबद्दल बोलताना तिने स्वत:ला बेशर्म असल्याचे म्हटले होते. विद्याचा अखेरचा हिट चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा होता. एका मुलाखतीत विद्याने म्हटले होते की, ‘यार ७-८ चित्रपट नका म्हणू, माझे केवळ पाचच चित्रपट हिट झाले नाहीत. सुरुवातीला जेव्हा मी सातत्याने अपयशी ठरत होती, तेव्हा मला खूपच दु:ख व्हायचे. त्यानंतर मला असे दु:ख सहन करण्याची सवय झाली आहे. असे म्हणतात ना, ‘निर्लज्जम सदा सुखी’ असेच मला वाटते. कारण ‘बेशर्म’ झाल्यास त्यात सुख मिळते असे मला वाटते. (विद्याने हे वक्तव्य हसत हसत केले होते.)



यावेळी विद्याने हेदेखील सांगितले की, चित्रपट फ्लॉप होण्याची मला कधीही भीती अथवा नर्वसनेसची फीलिंग येत नाही. हे पहा मी एक अभिनेत्री आहे, जोपर्यंत माझ्याकडे काम राहणार तोपर्यंत मी काम करीत राहील. मी काम एन्जॉय करू इच्छिते. मला असे वाटते की, मी खूप चांगला चित्रपट बनविला. माझा आगामी चित्रपट ‘तुम्हारी सुलु’ खूपच चांगला आहे. त्यामुळे मला खूप चांगले वाटत आहे. यावेळी विद्याने हेदेखील म्हटले की, ‘स्वत:ला बेशर्म म्हणण्याचा अर्थ असा की निडर, बिंधास्त आणि दिलदार असा होय. ‘तुम्हारी सुलु’ एक हॅप्पी चित्रपट आहे. 

विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलु’ हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या चित्रपटात विद्या बालनऐवजी नेहा धुपिया रेडिया जॉकी मलिश्का यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाकडून विद्याला भरपूर अपेक्षा आहेत. 

Web Title: Vidya Balan herself said, 'Nirjajam is always happy'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.