Video: निया शर्माने पोस्ट केला हा व्हिडीओ,अवघ्या काही तासातच ठरला हिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:15 IST2018-07-20T17:12:11+5:302018-07-20T17:15:57+5:30
नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचेही तिने म्हटले होते.

Video: निया शर्माने पोस्ट केला हा व्हिडीओ,अवघ्या काही तासातच ठरला हिट
बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो केले आहेत. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली. आपल्या स्टाइलसाठी प्रसिध्द असलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे.
निया शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नियाने केलेल्या एका फोटोशूटचा आहे. हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नियाने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका दिवसातच या व्हिडिओला 3.35 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.निया यामध्ये हॉट लूकमध्ये दिसतेय. तिने व्हाइट कलरचा गाऊन घातल्याचे पाहायला मिळत आहे.नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचेही तिने म्हटले होते.
आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे टीव्ही अभिनेत्री निया शर्मासोबत. निया शर्माच्या 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लॉन्चवेळी तिने स्लिट गाउन आणि हॉट पँट परिधान केला होता. पण हाच डिझायनर ड्रेस नियासाठी मात्र डोकेदुखी ठरला. पूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली होती. यामुळे निया भलतीच नर्व्हस झाल्याचे पाहायला मिळाले होते.
२७ वर्षांची निया शर्मा टीव्हीवरची सर्वाधिक बोल्ड अन ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परिचित आहे. निया शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘काली’ या टीव्ही शोमधून केली होती. ‘एक हजारों में मेरी बहना है’ या मालिकेतून तिला ख-या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ‘जमाई राजा’ या मालिकेत दिसली.यापाठोपाठ ‘खतरों के खिलाडी’च्या आठव्या सीझनमध्येही अनेक धोकादायक स्टंट करताना नियाला प्रेक्षकांनी पाहिले. निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. गतवर्षी ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत निया तिस-या स्थानावर होती.