Video : मॉरिशसच्या बीचवर लाठी-काठी खेळताना दिसली ही अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:17 PM2019-06-21T12:17:22+5:302019-06-21T12:23:14+5:30

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते

Video: Adah sharma enjoying vacation in mauritius | Video : मॉरिशसच्या बीचवर लाठी-काठी खेळताना दिसली ही अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती ?

Video : मॉरिशसच्या बीचवर लाठी-काठी खेळताना दिसली ही अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती ?

googlenewsNext
ठळक मुद्दे सध्या ती मॉरिशसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आम्ही बोलतोय अदा शर्मा बद्दल. अदा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून  ती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. 


अदा शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय. सध्या ती मॉरिशसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. हा व्हिडीओ तिने मॉरिशसमध्ये शूट केला आहे. यात ती लाठी काठीचा खेळ खेळताना दिसतेय. अदा हा मर्दानी खेळ मोठ्या चलाखिने खळताना दिसतेय. या व्हिडीओवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. 


अदाने बॉलिवूडमध्ये २००८ साली आलेल्या '१९२०' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती.


दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान तिला आहे. 'कमांडो ३'मध्ये ही अदाच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहेत. यासिनेमात अदासोबत  विद्युत, अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत. 

Web Title: Video: Adah sharma enjoying vacation in mauritius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.