दिग्गज निर्मात्यांच्या फ्लॉप मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:16 IST2016-01-16T01:11:52+5:302016-02-05T11:16:39+5:30

वेडिंग पुलाव या चित्रपटाच्या एका दिग्दर्शकाने आपल्या मुलीला नायिका म्हणून संधी दिली. परंतु या नायिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. ...

Veteran producers flop girls | दिग्गज निर्मात्यांच्या फ्लॉप मुली

दिग्गज निर्मात्यांच्या फ्लॉप मुली

डिंग पुलाव या चित्रपटाच्या एका दिग्दर्शकाने आपल्या मुलीला नायिका म्हणून संधी दिली. परंतु या नायिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. ही कहानी आहे निर्माता शशिरंजनची मुलगी अनुरंजनची. असाच अनुभव याआधी अनेक निर्मात्यांना आला आहे.शाहरुख खानचे मित्र आणि बिजनेस पार्टनर करीम मोरानीची मुलगी जोयाला दोनदा संधी मिळाली. परंतु तिचा चित्रपट आलवेज कभी कभीचा फार फायदा झाला नाही. यावर्षी भाग जानीदेखील सुपर फ्लॉप राहिला. असे ऐकण्यात आहे की एक्टिंगमुळे निराश जोया पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्राकडे वळत आहे.या यादीत इंद्र कुमारची मुलगी श्‍वेता कुमारचेही नाव आहे. तिला सुभाष घईंच्या कर्जच्या रिमेकमध्ये हिमेश रेशमिया बरोबर संधी देण्यात आली होती. सतीश कौशिकच्या निर्देशनात बनलेल्या रिमेकमध्ये श्‍वेताने टीना मुनीमचा रोल केला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. यानंतर श्‍वेतासाठी तिचे वडील इंद्र कुमार यांनी स्वत: चित्रपट बनविला. ज्यात रेखाला आजीची भूमिका देण्यात आली आणि आपल्या मुलीची शरमन जोशीबरोबर जोडी बनविली. मात्र बॉक्स ऑफिसवर या आजीची कथा कोणालाच पसंत नाही पडली.प्रेमनाथचा मुलगा प्रेमकिशनची मुलगी आकांक्षाला सलमान खान नायक असलेल्या गर्वमध्ये त्याच्या बहिणीच्या रोलमध्ये दाखविण्यात आले आणि तिचे करिअर तिथेच संपले. विशेष म्हणजे गर्वचे निर्माण प्रेमकिशननेच केले होते.
           अजय देवगनचे मॅनेजर कुमार मंगत दिग्दर्शक झाल्यानंतर त्यांची मुलगी अमिता पाठक सुद्धा नायिका झाली. हाले दिल या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला. या चित्रपटाला स्वत: तिच्या वडिलांनी तिच्यासाठी बनविले होते. त्यानंतर कुमार मंगतने आपल्या मुलीला प्रियदर्शनच्या आक्रोशमध्ये फिट केले. अजय देवगन, बिपाशा बसू आणि अक्षय खन्नासारख्या नायकांसोबत अमितचे काही जमले नाही आणि २0१४ मध्ये संगीतकार राघव सचारसोबत अमिताने लग्न करुन चित्रपट करिअरला बाय बाय केले.

Web Title: Veteran producers flop girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.