ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावली, जुहू येथील रुग्णालयात दाखल; उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 10:50 PM2023-12-17T22:50:29+5:302023-12-17T22:54:20+5:30

तनुजा या लोकप्रिय अभिनेत्री काजोल यांची आई आहे

Veteran actress Tanuja condition deteriorated admitted to ICU of a hospital in Juhu Mumbai | ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावली, जुहू येथील रुग्णालयात दाखल; उपचार सुरू

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती खालावली, जुहू येथील रुग्णालयात दाखल; उपचार सुरू

Tanuja Hospitalized : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री तनुजा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकप्रिय अभिनेत्री काजोल यांची आई (Kajol Mother) तनुजा या ८० वर्षांच्या असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागा (ICU) मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची आज अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. वयोमानानुसार स्वास्थ्यासंबंधित तक्रारींमुळे त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. तनुजा यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. मिळालेल्या अहवालातील माहितीनुसार, 'त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्या औषधोपचारांना योग्य रितीने प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत काळजी करण्यासारखे काही नाही,' असे सांगण्यात आले आहे.

लोकप्रिय अभिनेत्री तनुजा यांनी अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुपरस्टार शोभना समर्थ आणि निर्माते कुमारसेन समर्थ यांची त्या मुलगी आहेत. तनुजा यांची बहिण नूतन यादेखील अभिनेत्री. तसेच, अभिनेत्री काजोल आणि तनिषा या तनुजा यांच्या दोन मुली आहेत.

वयाच्या १६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण

तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ ला झाला. तनुजा यांनी लहान वयातच आपल्या अभिनयाने सर्वांना मोहित केले. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तनुजा यांचा पहिला चित्रपट 'छबिली' गाजला. त्यानंतर 1962 मध्ये आलेल्या 'मेम दीदी' चित्रपटात त्या दिसल्या. तनुजा यांचा 'बहारों फिर भी आएंगी', 'ज्वेल थीफ', 'हाथी मेरे साथी' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनय चांगलाच गाजला. 'मेरे जीवनसाथी' सारख्या चित्रपटांसाठी त्यांना विशेष ओळख मिळवून दिली.

Web Title: Veteran actress Tanuja condition deteriorated admitted to ICU of a hospital in Juhu Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.