ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 19:33 IST2016-06-04T13:28:48+5:302016-06-04T19:33:32+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज शनिवारी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

Veteran actress Sulbha Deshpande passes away | ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

 
डद्यावरची मायाळू ‘आई’अशी आगळीवेगळी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज शनिवारी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. मुलगी अदिती देशपांडे आणि मुलगा निनाद देशपांडे बाहेरगावी असल्याने  सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर उद्या संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. नाटक, टीव्ही , चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात लीलया वावरणाºया आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाºया सुलभा देशपांडे यांचा जन्म १९३७ मध्ये झाला. सुमारे ७३ चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.चौकट राजा', 'जैत रे जैत', 'आदमी खिलौना है', 'गुलाम-ए-मुस्तफा' सारख्या चित्रपटांमधून त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. अनेक टीव्ही मालिकांमध्ये त्या दिसल्या.‘अस्मिता’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत त्या शेवटच्या झळकल्या.  मुंबईतील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या. याचदरम्यान सुविख्यात नाटककार विजय तेंडुलकर  यांनी त्यांना मुलांसाठी नाटक लिहायची गळ घातली. येथूनच सुलभा देशपांडे यांचा नाट्यसृष्टीत प्रवेश झाला. साठच्या दशकात त्या ‘रंगायन’च्या माध्यमातून रंगभूमीशी जुळल्या. विजया मेहता,श्रीराम लागू आदींशी त्यांची मैत्री जमली. १९७३ साली  त्यांनी पती अरविंद देशपांडे यांच्यासोबत आविष्कार संस्थेची स्थापना केली.   



 सुलभा देशपांडे यांचा अल्प परिचय

चोखंदळ रसिकांच्या मनातले ज्यांचे स्थान अढळ असते, अशा दुमिर्ळ कलाकारांपैकी एक म्हणजे सुलभाताई. त्यांच्या रंगभूमी, विशेषत: प्रायोगिक रंगभूमीवरच्या निष्ठेचा राज्य सरकारने नुकताच 'नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार' जाहीर करून गौरव केला. 'रंगायन' विखुरल्यानंतर अरविंद देशपांडे, अरुण काकडे आणि पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर यांनी 'आविष्कार' ही नाट्यसंस्था काढली. सुलभा देशपांडे आणि माधव साखरदांडे यांनी 'आविष्कार'च्या 'चंदशाला' या बालरंगभूमीची धुरा सांभाळली. 'बाबा हरवले आहेत', 'राजा राणीला घाम हवा' यासारख्या बालनाटकांची त्यांनी निमिर्ती केली. पार्वतीकुमार यांच्या मदतीने 'दुर्गा झाली गौरी'सारखे नृत्यनाट्य उभे केले. बालरंगभूमीच्या निमित्ताने देशविदेशातील बालरंगभूमीचा अभ्यास केला. छबिलदास शाळेतील शिक्षिका ते समर्थ नाट्यकमीर्, प्रगल्भ अभिनेत्री असे संपन्न व्यक्तिमत्त्व सुलभाताईंना लाभले. प्रायोगिक रंगभूमीवर त्या निष्ठेने काम करत राहिल्या. त्यामानाने व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे आगमन उशिरा झाले. विजय तेंडुलकरांच्या 'शांतता कोर्ट चालू आहे'तील बेणारे बाईंच्या व्यक्तिरेखेने त्यांना निराळी ओळख मिळवून दिली. व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शकीय कारकीर्द भरात असताना अरविंद देशपांडे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सुलभाताईंनी अरुण काकडे यांच्या साथीने 'आविष्कार' कार्यरत ठेवली. समविचारी नाट्यसंस्था, समूहांच्या एकत्रित चळवळीला 'छबिलदास चळवळ' म्हणून मिळालेल्या लौकिकात सुलभाताईंचा सहभाग महत्त्वाचा आहे. १९५०च्या दशकात स्पर्धांमधून रंगभूमीवर आलेल्या सुलभाताईंना व्यावसायिक रंगभूमी खुणावत होती. तरी त्यांनी प्रायोगिकतेची कास सोडली नाही. व्यावसायिक नाटके आणि चित्रपटांतून त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. भूमिका, जैत रे जैत, विजेता, सलाम बॉम्बे अशा सिनेमांमधून तसेच टीव्ही मालिकांमध्येही त्या भेटल्या.   संगीत नाटक अकादमी, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान, रंगभूमी जीवनगौरव   पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.

 
 भूमिका केलेले चित्रपट :

अब इंसाफ़ होगा (१९९५)अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है (१९८०)आदमी खिलौना है (१९९३)इजाज़त (१९८७)एक फूल तीन कांटे (१९९७)कस्तूरी (१९८०)कॉमन मॅन (१९९७) (टी.व्ही.)कारोबार (२०००)क्रोध (१९९०)खून भरी मांग (१९८८)गमन (१९७८)गुलाम-ऐ-मुस्तफा (१९९७)गैर (१९९९)घर द्वार (१९८५)घर हो तो ऐसा (१९९०)चौकट राजा (१९९१)चौराहा (१९९४)जादू का शंख (१९७४)जान तेरे नाम (१९९२)जानू (१९८५)जैत रे जैत (१९७७)डॉटर्स ऑफ़ धिस सेंचुरी (२००१)तमन्ना (१९९७)तमाचा (१९८८)तरंग (१९८४)त्रिदेव (१९८९)द फिल्म (२००५)दर्पण के पीछे (२००५)दिल आशना है (१९९२)दुनिया (१९८४)दुश्मन देवता (१९९१)बदलते रिश्ते (१९९६) टीव्ही मालिकाबाज़ार (१९८२)भीगी पलकें (१९८२)भीष्म (१९९६)भूमिका (१९७७)भैरवी (१९९६)मन (१९९९)मान्सून (२००६)मिस्टर आज़ाद (१९९४)मोक्ष: साल्वेशन (२००१)यह कैसा इंसाफ़ (१९८०)याराना (१९९५)युगपुरुष (१९९८)राजा की आयेगी बारात (१९९७)रामनगरी (१९८२)लोरी (१९८४)विजेता (१९८२)विरासत (१९९७)शंकरा (१९९१)शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१)संध्या छाया (१९९५) (टीव्ही)सलाम बोम्बे! (१९८८)सितम (१९८२)सुर संगम (१९८५)हमला (१९९२)हेच माझं माहेर (१९८४)

दिग्दर्शित चित्रपट :

राजा रानी को चाहिए पसीना (१९७८)

Web Title: Veteran actress Sulbha Deshpande passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.