​या दिग्गज अभिनेत्याने एक्स्ट्रा म्हणून अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:58 IST2017-10-05T11:28:13+5:302017-10-05T16:58:13+5:30

क्लासिक लिजंड सिझन ४ नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या सिझनमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा अभिनय प्रवास, त्यांनी केलेला स्ट्रगल ...

This veteran actor has worked in many movies such as Xtra | ​या दिग्गज अभिनेत्याने एक्स्ट्रा म्हणून अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम

​या दिग्गज अभिनेत्याने एक्स्ट्रा म्हणून अनेक चित्रपटांमध्ये केले आहे काम

लासिक लिजंड सिझन ४ नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून या सिझनमध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा अभिनय प्रवास, त्यांनी केलेला स्ट्रगल प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. जावेद अख्तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून या कार्यक्रमतील त्यांच्या सूत्रसंचालनाच्या शैलीमुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम खूपच आवडत आहे. या कार्यक्रमात पुढील भागात प्रेक्षकांना राजेंद्र कुमार यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे.
राजेंद्र कुमार यांना ज्युबली अभिनेता म्हटले जात असे. त्यांच्या अनेक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, राजेंद्र कुमार यांच्या करियरची सुरुवात एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक एक्स्ट्रा कलाकार म्हणून झाली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड स्ट्रगल केला आहे. राजेंद्र कुमार यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे १९२९ मध्ये झाला. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर ते मुंबईत राहायला आले. ते खूपच श्रीमंत होते. पण फाळणीमुळे त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली. कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. घर चालवण्यासाठी काम शोधत असतानाच एच एस रावेल यांनी त्यांना त्याच्या चित्रपटात सह-दिग्दर्शन करण्याची संधी दिली. सह-दिग्दर्शक म्हणून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण दिग्दर्शनाकडे न वळता ते अभिनयाकडे वळले. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एक्स्ट्रा म्हणून काम केले. चांगली भूमिका मिळत नसल्याने अभिनयचा व्यवसाय म्हणून त्यांनी कधीच विचार केला नव्हता. पण गीता बालीसोबत एका चित्रपटात त्यांना सहकलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यांच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. पण तरीही सह-दिग्दर्शक म्हणूनच ते एच एस रावेल यांच्यासोबत काम करत होते. त्यांनी या दरम्यान तुफान, आवाज यांसारख्या चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारल्या. पण मदर इंडिया या चित्रपटाने त्यांचे संपूर्ण करियरच बदलून टाकले. या चित्रपटामुळे एक चांगला अभिनेता म्हणून लोकांनी त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली आणि पुढील काळात त्यांना अनेक चित्रपटात नायकाची भूमिका साकारायला मिळाल्या. आज दिग्गज अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना केली जाते. 

rajendra kumar


Also Read : ​क्लासिक लिजंड्‌स सीझन ४चे जावेद अख्तर करणार सूत्रसंचालन

Web Title: This veteran actor has worked in many movies such as Xtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.