गोविंदाच्या आरोपावर वरुण धवनने साधली चुप्पी... फक्त एवढेच म्हटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 19:50 IST2017-02-11T14:20:40+5:302017-02-11T19:50:40+5:30

बॉलिवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला नेहमीच सुरू असतो. यातील बहुतांश वाद हे सिनेमांशी संबंधित असतात. सध्या असाच काहीसा वाद धवन परिवार ...

Varun Dhawan's silent silence on Govinda's charge ... just said that! | गोविंदाच्या आरोपावर वरुण धवनने साधली चुप्पी... फक्त एवढेच म्हटले!

गोविंदाच्या आरोपावर वरुण धवनने साधली चुप्पी... फक्त एवढेच म्हटले!

लिवूडमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला नेहमीच सुरू असतो. यातील बहुतांश वाद हे सिनेमांशी संबंधित असतात. सध्या असाच काहीसा वाद धवन परिवार आणि गोविंदामध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यावर बेछुट आरोप करणारा अभिनेता गोविंदावर काही बोलण्यास वरुण धवनने टाळले आहे. त्याने आपल्या वडिलांवर केलेल्या गोविंदाच्या आरोपांना उत्तर न देता, ‘मला काही ऐकायला येत नाही’ एवढेच सुचक वक्तव्य करून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. 



सध्या वरुण त्याच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेव्हा त्याला गोविंदाने वडील डेव्हीड धवनवर केलेल्या आरोपांविषयी विचारण्यात आले तेव्हा वरुण म्हणाला की, मला याविषयी काहीच माहीत नाही. यावर गोविंदाने केलेले आरोप त्याला सांगण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा तो, ‘मला काही ऐकायला येत नाही’ असे म्हणत या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास असमर्थता दर्शविली.

गोविंदा लवकरच त्याच्या ‘आ गया हीरो’ या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेता म्हणून पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे. जेव्हा त्याला दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याविषयी विचारण्यात आले होते तेव्हा तो म्हणाला की, डेव्हिड धवनने केवळ त्याच्या सिनेमाची कॉन्सेप्टच चोरली नाही तर त्यावर सिनेमाही (चश्मेबद्दूर) बनविला. शिवाय ऋषी कपूर याला संधी दिली. मी डेव्हिडला म्हटले होते की, माझ्यासोबत तू १८ वा सिनेमा बनविण्यास उत्सुक आहेस का तेव्हा त्याने सकारात्मकता दर्शवित माझा सब्जेक्ट चोरला. त्यात ऋषी कपूरला कास्ट केले. मी त्याला म्हटले की, मला गेस्ट अपियरेंस म्हणून संधी दे! परंतु त्यासही त्याने नकार दिला.

यावेळी गोविंदाने असेही सांगितले की, मी डेव्हिडला खूप वेळा रिक्वेस्ट केली की, मला एक शॉटची तरी संधी दे, जेणेकरून त्याच्यासोबत मला १८व्या सिनेमात काम केल्याचे समाधान वाटेल. मात्र त्याच्या डोक्यात वेगळेच खूळ सुरू होते. त्यानंतर मात्र आमच्यात कुठलाही संपर्क झाला नाही. 



गोविंदा आणि डेव्हिड धवन यांनी तब्बल १७ सिनेमे एकत्र केले आहेत. १९९० मध्ये त्यांचा ‘जोडी नंबर १’ हा शेवटचा सिनेमा आला होता. त्यानंतर मात्र पुन्हा ही जोडी एकत्र आली नाही. ‘कुली नंबर १’, ‘बडे मियां छोटे मियां’, ‘हसीना मान जाएगी’ असे सुपरहिट सिनेमे दिलेल्या या जोडीत सध्या मात्र जबरदस्त वादाची ठिणगी पडली आहे. गोविंदाचा आगामी ‘आ गया है हीरो’ हा सिनेमा वरुण धवनच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या एक आठवड्यापूर्वी रिलिज होणार आहे. आता बॉक्स आॅफिसवर या दोघांपैकी कोण गल्ला जमविण्यात यशस्वी होईल, हे बघणे मजेशीर ठरेल. 

Web Title: Varun Dhawan's silent silence on Govinda's charge ... just said that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.