सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनची एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 10:50 AM2018-10-02T10:50:43+5:302018-10-02T10:58:49+5:30

अभिनेता वरुण धवनची सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टाटर 'भारत' सिनेमात एंट्री झाली आहे. भारतमध्ये वरुण कॅमिओ करणार आहे.

Varun Dhawan's entry in Salman Khan's 'Bharat'! | सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनची एंट्री!

सलमान खानच्या 'भारत'मध्ये वरुण धवनची एंट्री!

googlenewsNext
ठळक मुद्दे 'भारत'मध्ये वरुण कॅमिओ करणार आहे. हा सिनेमा ‘ओड टू माई फादर’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे

अभिनेता वरुण धवनची सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टाटर 'भारत' सिनेमात एंट्री झाली आहे. 'भारत'मध्ये वरुण कॅमिओ करणार आहे. अजूनपर्यंत याबाबत काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अली अब्बास जफरसध्या यासिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूल शूटिंग अबू धाबीमध्ये करतोय.  

 
अली अब्बास जफर 'टायगर जिंदा है'नंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. माल्टामध्ये या सिनेमाचे बरेचसे सीन्स शूट करण्यात आले आहेत. दुसऱ्या शेड्यूलसाठी टीम आबू धाबीला पोहोचली आहे. हा सिनेमा ‘ओड टू माई फादर’चा आॅफिशिअल हिंदी रिमेक आहे. प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला प्रियांका व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   

सिनेमाच्या कथेनुसार, सलमानला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी सर्कशीत काम करावे लागते. यात तो ‘मौत का कुआँ’मध्ये मोटरसायकलवर चित्तथरारक कसरती करताना दिसेल. त्याच्यासोबत या काळात दिशा पाटनीही दिसेल. दिशाने यात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारली असल्याचे कळतेय.

Web Title: Varun Dhawan's entry in Salman Khan's 'Bharat'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.